AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : पर्पल कॅपच्या शर्यतीत बांगलादेशचा खेळाडू अव्वल, पहिल्याच सामन्यात घेतल्या दणादण विकेट्स

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सने 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात खऱ्या अर्थाने हिरो ठरला तो बांगलादेशचा मुस्तफिझुर रहमान..त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे 4 गडी बाद केले आणि बॅकफूटला ढकललं. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

IPL 2024 : पर्पल कॅपच्या शर्यतीत बांगलादेशचा खेळाडू अव्वल, पहिल्याच सामन्यात घेतल्या दणादण विकेट्स
मुस्तफिझुर रहमानImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 23, 2024 | 12:50 AM
Share

पर्पल कॅप हा मानाचा पुरस्कार आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला हंगामातील सर्वोत्तम गोलंदाज मानलं जातं. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप आणि 15 लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाते. तसं पाहिलं तर आयपीएलमध्ये गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई होते. मात्र असं असूनही काही गोलंदाज आपली छाप सोडतात. फलंदाजांना फटकेबाजी करण्यास रोखतात. असंच काहीसं चित्र चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात पाहायला मिळालं.  बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली होती. फाफकडून जबरदस्त धुलाई सुरु होती. या जोडीने 41 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाज काही अंशी हतबल दिसत होते. मात्र पाचवं षटक ऋतुराज गायकवाड याने बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमान याच्याकडे सोपवलं आणि दुसऱ्या चेंडूपासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ बॅकफूटवर गेला. फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांना माघारी धाडलं. त्यानंतर विराट कोहली आणि कॅमरोन ग्रीन यांच्याही विकेट्स घेतल्या. पहिल्याच सामन्यात मुस्तफिझुर रहमानने 4 गडी बाद केले.

मुस्तफिझुरने 4 षटकात 29 धावा देत 4 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 7.25 इतका होता. त्यानंतर आरसीबीच्या कॅमरून ग्रीनने 27 धावा देत 2 गडी बाद केले. तर दीपक चाहर, यश दयाल आणि कर्ण शर्माने प्रत्येक एक गडी बाद केला. पर्पल कॅपसाठी गोलंदाजांमध्ये येत्या काही सामन्यात रेस पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमानने आपली छाप सोडली आहे.

गोलंदाजसामनेइकॉनोमीविकेट्स
मुस्तफिझुर रहमान38.83 7
मयंक यादव35.126
युजवेंद्र चहल35.506
मोहित शर्मा37.756
खलील अहमद48.186

ड्वेन ब्राव्होने दोनदा (2013, 2015) पर्पल कॅप जिंकली आहे. भुवनेश्वर कुमार (2016, 2017) यानेही हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे.

2008- सोहेल तनवीर, राजस्थान रॉयल्स, 22 विकेट्स 2009- आरपी सिंह, डेक्कन चार्जर्स, 23 विकेट्स 2010 – प्रज्ञान ओझा, डेक्कन चार्जर्स, 22 विकेट्स 2011- लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्स, 28 विकेट्स 2012- मोर्ने मॉर्केल, दिल्ली डेअरडेव्हिल्स, 25 विकेट्स 2013- ड्वेन ब्रावो, चेन्नई सुपर किंग्स, 32 विकेट्स 2014- मोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्स, 23 विकेट्स 2015- ड्वेन ब्रावो, चेन्नई सुप किंग्स, 26 विकेट्स 2016- भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 23 विकेट्स 2017- भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 26 विकेट्स 2018- अँड्र्यू टाय, किंग्स 11 पंजाब, 24 विकेट्स 2019- इम्रान ताहीर, चेन्नई सुपर किंग्स, 26 विकेट्स 2020- कगिसो रबाडा, दिल्ली कॅपिट्ल, 30 विकेट्स 2021- हर्षल पटेल, आरसीबी, 32 विकेट्स 2022- युजवेंद्र चहल, राजस्थान रॉयल्स, 27 विकेट्स 2023- मोहम्मद शमी, गुजरात टायटन्स, 28 विकेटच्स

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.