AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ire vs Afg 4th T20I : राशिद खाननं अवघ्या 18 चेंडूत सामना संपवला, चौथ्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा पराभव

रशीद खान 10 चेंडूत 31 धावा करत नाबाद राहिला. या डावात त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. चौकारावरून 22 धावा झाल्या. सलामीवीर फलंदाज रहमतुल्ला गुरबाजनेही 13 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले.

Ire vs Afg 4th T20I : राशिद खाननं अवघ्या 18 चेंडूत सामना संपवला, चौथ्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा पराभव
राशिद खान सामनावीरImage Credit source: social
| Updated on: Aug 16, 2022 | 8:09 AM
Share

नवी दिल्ली : राशिद खान (Rashid Khan) हा टी-20 (T-20)चा दिग्गज खेळाडू मानला जातो. या खेळाडूने ते पुन्हा एकदा सिद्ध केले. आयर्लंड विरुद्धच्या चौथ्या T20 मध्ये (IRE vs AFG) त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह कामगिरी केली. अशाप्रकारे अफगाणिस्ताननं हा सामना 27 धावांनी जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली. एकवेळ संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होता. पावसामुळे सामना 11-11 षटकांचा करण्यात आला. अफगाणिस्ताननं प्रथम खेळताना 6 बाद 132 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 105 धावा करून बाद झाला. या मालिकेतील अंतिम सामना उद्या होणार आहे. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने वेगवान सुरुवात केली. पण त्यांनी 76 धावांत 5 मोठे विकेट गमावले. यानंतर राशिद खान आणि नजीबुल्ला जद्रान यांनी 18 चेंडूत 50 धावांची भागीदारी करत संघात पुनरागमन केले. हाही सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. नजीबुल्लाहने 24 चेंडूत 50 धावा केल्या. स्ट्राइक रेट 208 होता. त्याने 4 चौकार आणि 3 षटकारही मारले.

राशिदचा स्ट्राईक रेट 310

रशीद खान 10 चेंडूत 31 धावा करत नाबाद राहिला. त्याचा स्ट्राईक रेट 310 होता. या डावात त्याने एक चौकार आणि तीन षटकार मारले. म्हणजेच चौकारावरून 22 धावा झाल्या. सलामीवीर फलंदाज रहमतुल्ला गुरबाजनेही 13 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. 3 चौकार आणि 2 षटकार मारले. लेगस्पिनर गॅरेथ डेन्लीने आयर्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 3 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. संघाच्या सर्व 6 गोलंदाजांनी 10 च्या वरच्या इकॉनॉमीमधून धावा लुटल्या.

हायलाईट्स

  1. अफगाणिस्ताननं प्रथम खेळताना 6 बाद 132 धावा केल्या
  2. प्रत्युत्तरात यजमान आयर्लंडचा संघ 105 धावा करून बाद
  3. मालिकेतील अंतिम सामना उद्या होणार आहे
  4. अफगाणिस्ताननं हा सामना 27 धावांनी जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी
  5. अफगाणिस्तानने वेगवान सुरुवात केली
  6. अफगाणिस्तानने 76 धावांत 5 मोठे विकेट गमावले.
  7. राशिद खान आणि नजीबुल्ला जद्रान यांनी 18 चेंडूत 50 धावांची भागीदारी करत संघात पुनरागमन केले
  8. शीद खान 10 चेंडूत 31 धावा करत नाबाद राहिला. त्याचा स्ट्राईक रेट 310 होता
  9. नजीबुल्लाहने 24 चेंडूत 50 धावा केल्या. स्ट्राइक रेट 208 होता. त्याने 4 चौकार आणि 3 षटकारही मारले.
  10. सलामीवीर फलंदाज रहमतुल्ला गुरबाजनेही 13 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले
  11. लेगस्पिनर गॅरेथ डेन्लीने आयर्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली

पावसामुळे सामना 11-11 षटकांचा

फगाणिस्ताननं हा सामना 27 धावांनी जिंकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली. एकवेळ संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होता. पावसामुळे सामना 11-11 षटकांचा करण्यात आला.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.