AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni IPL 2023 : VIDEO, गुडबाय सेल्फी, मैदानाला फेरी….

MS Dhoni IPL 2023 : मॅचनंतर धोनीने संपूर्ण मैदानाला मारली फेरी, माहीची ही शेवटची मॅच होती का? फॅन्स, प्लेयर्सच नाही, तर 14 मे च्या रात्री संपूर्ण चेन्नई भावूक झाली होती. धोनीने मैदानावर उपस्थित पोलिसांचे सुद्धा आभार मानले.

MS Dhoni IPL 2023 : VIDEO, गुडबाय सेल्फी, मैदानाला फेरी....
CSK IPL 2023 MS Dhoni
| Updated on: May 15, 2023 | 12:44 PM
Share

चेन्नई : प्रेक्षकांनी खच्चून भरलेलं चेपॉक स्टेडियम, पिवळी जर्सी परिधान करुन CSK चे पोस्टर्स हातात घेऊन बसलेले हजारो फॅन्स, माहीचं संपूर्ण टीमसोबत ग्राऊंडला फेरी मारणं, माहीचं रॅकेट हातात घेऊन प्रेक्षक स्टँडमध्ये टेनिस बॉल मारुन आभार मानणं, संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी-धोनीचा गजर, हा सर्व घटनाक्रम काय इशारा करतोय? धोनीची आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईमध्ये शेवटची मॅच होती का? काल रात्री कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मॅचनंतर भव्य नजारा पहायला मिळाला. 16 व्या सीजनमध्ये आपल्या घरात चेन्नई सुपर किंग्सचा हा शेवटचा सामना होता.

फॅन्स, प्लेयर्सच नाही, तर 14 मे च्या रात्री संपूर्ण चेन्नई भावूक झाली होती. धोनीने मैदानावर उपस्थित पोलिसांचे सुद्धा आभार मानले. त्याची गुडघे दुखापतीची जुनी समस्या पुन्हा दिसत होती. नी-कॅप घालून तो संपूर्ण मैदानाला फेरी मारत होता.

थालाने त्याला सुद्धा निराश केलं नाही

या दरम्यान महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आपल्या शर्टावर धोनीची ऑटोग्राफ घेतली. प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला केकेआरचा रिंकू सिंह सुद्धा ऑटोग्राफ घेण्यासाठी धोनीकडे आला. थालाने त्याला सुद्धा निराश केलं नाही. आता या सगळ्यामध्ये एकच प्रश्न आहे, धोनी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून पुन्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना दिसेल का?

अजून दोन संधी आहेत

चेन्नईमध्ये आता फक्त दोन सामने होणार आहेत. क्वालिफायर-1 आणि 24 मे रोजी एलिमिनेटर चेपॉकवरच होणार आहे. चेन्नईची टीम प्लेऑफमध्ये दाखल झाली, तर माहीचे फॅन्स त्याची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येऊ शकतात. धोनीचा हा शेवटचा सीजन असल्याची सुद्धा सर्वत्र चर्चा आहे. धोनील ज्यावेळी या बद्दल प्रश्न विचारला जातो, तेव्हा तो हजरजबाबीपणाने उत्तर देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो. साखळी गटात चेन्नईचा शेवटचा सामना कधी?

चेन्नई सुपरकिंग्सची टीम 13 सामन्यात 15 पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेची पुढची मॅच 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अरुण जेटली स्टेडियमध्ये होणार आहे. सीएसकेची ही शेवटची लीग मॅच आहे.

Follow Us
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ