AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : ईशान किशनचा आरसीबीला तडाखा, 9 बॉलमध्ये 44 धावा, इतक्या बॉलमध्ये अर्धशतक

Ishan Kishan Fifty MI vs RCB IPL 2024 : ईशान किशन याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध तडाखेदार अर्धशतक ठोकत मुंबईला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे.

MI vs RCB : ईशान किशनचा आरसीबीला तडाखा, 9 बॉलमध्ये 44 धावा, इतक्या बॉलमध्ये अर्धशतक
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 11, 2024 | 10:51 PM
Share

मुंबई इंडियन्सचा विकेटकीपर ओपनर बॅट्समन ईशान किशन याने वानखेडे स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध विजयी आव्हानाचा पाठलगा करताना विस्फोटक खेळी केली आहे. ईशानने अवघ्या 23 बॉलमध्ये आयपीएलच्या कारकीर्दीतील 16 वं अर्धशतक ठोकलं. ईशान किशन याने या अर्धशतकादरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी करत गगनचुंबी शॉट मारले. तसेच आरसीबीच्या गोलंदांजांच्या चिंढड्या चिंढड्या केल्या. तसेच रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सला वादळी सुरुवात करुन दिली. ईशान किशन याने 217.39 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. अर्थात ईशानने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 9 बॉलमध्ये 44 धावा ठोकल्या.

आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 197 धावांचा पाठलाग करताना रोहित आणि ईशान या जोडीने वादळी सुरुवात केली. ईशानचा धावा करण्याचा वेग पाहून रोहितने त्याला अधिक संधी दिली. ईशानने त्याचा फायदा घेत दे दणादण फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं. ईशानने अर्धशतकानंतर टॉप गिअर टाकला. ईशानचा झंझावात पाहून तो शतक ठोकणार असंच वाटत होतं. मात्र आकाश दीप याने ईशानला रोखलं. आकाशने ईशानला 69 धावांवर रोखलं. विराटने ईशानचा कॅच घेतला. ईशानने 34 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 7 फोरसह 202.94 च्या स्ट्राईक रेटने 69 धावांची खेळी केली.

रोहितसोबत शतकी भागीदारी

दरम्यान रोहित आणि ईशान या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. या दोघांनी 8.5 ओव्हरमध्ये या 101 धावा केल्या. ईशान 69 धावांवर आऊट होत त्याने मुंबईच्या विजयाचा पाया यशस्वीरित्या रचला. आता मुंबईच्या विजयाची जबाबदारी इतर फलंदाजांवर असणार आहे.

ईशानची तडाखेदार खेळी

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी आणि आकाश मधवाल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

Follow Us
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा
मिरा-भाईंदर ते घाटकोपर… बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा.
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट...
राजकारणात मोठं घडणार? देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट....
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला
दिल्ली दौऱ्यामागचं गुपित काय?; फडणवीस-शिंदे-पवारांचा मुक्काम वाढला.
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश
बापरे! थेट त्या फ्लॅटवर 'प्लॅटिनम गोल्ड बॅच'च, मोटेगावकराचाही समावेश.
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत
'55 रेडे कापून सत्तेत आले अन् दुसऱ्यांच्या कुर्बानीला...' राऊत.
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं....
नीट पेपरफुटी प्रकरणात सरकारचं मौन, राऊत म्हणाले, याचा अर्थ भाजपचं.....
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल..
रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?
सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?.