AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction Highest Paid Players: आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू, या खेळाडूंचा 10 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश

IPL 2022 Highest Paid Players List: आज एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना विकत घेतलं. 23 खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही.

IPL 2022 Auction Highest Paid Players: आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू, या खेळाडूंचा 10 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 10:12 PM
Share

TATA IPL 2022 Auction चा पहिला दिवस संपला आहे. आज एकूण 97 खेळाडूंवर बोली लागली. यात 74 खेळाडूंना विकत घेतलं. 23 खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. लिलावात विकत घेतलेल्या 74 खेळाडूंमध्ये 20 परदेशी खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये आज अपेक्षेप्रमाणे अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली तर सुरेश रैना, (Suresh Raina) स्टीव्ह स्मिथ सारख्या नावाजलेल्या खेळाडूंना कोणी विकत घेतल नाही. अनकॅप्ड प्लेयर्समध्ये अनेक युवा खेळाडूंना मोठी किंमत मिळाली. भारतीय संघाकडून अजून पदार्पण न केलेल्या या खेळाडूंसाठी फ्रेंचायजींनी सढळ हस्ते रक्कम खर्च केली. यात आवेश खान, (Avesh khan) शाहरुख खान, राहुल तेवतिया यांची नाव घ्यावी लागतील. या युवा खेळाडूंची बेस प्राइस काही लाख रुपये असूनही त्यांच्यावर कोट्यवधीची बोली लागली.

आज 10 कोटीच्या क्लबमध्ये कोणाचा समावेश झाला

इशान किशन आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्यांच्या इतिहासात प्रथमच एका खेळाडूसाठी 15.25 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम मोजली. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.

दीपक चाहर

मोठ्या बिडींग वॉरनंतर दीपक चाहरला चेन्नईने पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने त्याच्यासाठी 14 कोटींची बोली लावली. दीपकसाठी दिल्ली, चेन्नई, राजस्थान आणि हैदराबाद या फ्रँचायझींमध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं.

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतलं. श्रेयसला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. श्रेयसला केकेआरचा कॅप्टन बनू शकतो. कारण सध्या त्यांच्याकडे दुसरा कुठलाही कर्णधार नाहीय. 2015 मध्ये पहिल्यांदा श्रेयस अय्यरवर बोली लागली होती. त्यावेळी दिल्लीने अय्यरला 2.6 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

निकोलस पूरन

निकोलस पूरन आजच्या दिवसातला तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी 10.50 कोटींपर्यंत बोली लावली. पर्समध्ये केवळ 20 कोटी रुपये असूनही कोलकात्याने पूरनसाठी बोली लावली.

प्रसिद्ध कृष्णा

जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णासाठी राजस्थानने 10 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. कृष्णा यंदाच्या लिलावातला दुसऱा सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

लॉकी फर्ग्युसन

लॉकी फर्ग्युसनसाठी 10 कोटी रुपयांची बोली लावत गुजरात टायटन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

शार्दुल ठाकूर 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लॉर्ड या नावाने प्रसिद्ध असलेल्या जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरवर आयपीएलच्या लिलावात पैशाचा पाऊस पडला. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं. ठाकूरसाठी दिल्ली, पंबाज आणि चेन्नई या तीन फ्रँचायझींमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली.

आवेश खान 

आवेश खानसाठी फ्रेंचायजीमध्ये जोरदार चुरस दिसली. 20 लाख बेस प्राइस असलेल्या आवेश खानसाठी सीएसके, मुंबई इंडियन्स, SRH आणि लखनऊ जायंट्सने बोली लावली. अखेर लखनऊने बोली जिंकत तब्बल 10 कोटी रुपयांना आवेश खानला विकत घेतलं. मागच्यावेळी दिल्लीने त्याला 70 लाखांना विकत घेतलं होतं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.