AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयानंतर जास्मिन वालियाला व्हिआयपी ट्रीटमेंट, ‘त्या’ व्हिडीओमुळे हार्दिकसोबतच्या नात्याची पुन्हा रंगली चर्चा!

आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत विजयी ट्रॅक पकडला आहे. तसेच गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. आता पुढे विजयी घोडदौड अपेक्षित आहे. असं असताना एका व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. जास्मिन वालिया हीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विजयानंतर जास्मिन वालियाला व्हिआयपी ट्रीटमेंट, 'त्या' व्हिडीओमुळे हार्दिकसोबतच्या नात्याची पुन्हा रंगली चर्चा!
Image Credit source: TV9 Kannad
| Updated on: Apr 01, 2025 | 12:55 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत मिस्ट्री गर्ल कायम चर्चेत असतात. सध्या जास्मिन वालियाची चर्चा रंगली आहे. ब्रिटीश गायिका आणि टीव्ही प्रेझेंटर जास्मिन वालिया आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीतून ती मुंबई इंडियन्स आणि खासकरून हार्दिक पांड्याला पाठिंबा देताना दिसली आहे. सोमवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान जास्मिन देखील दिसली होती. या सामन्यानंतरचा संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.स्टेडियममध्ये हार्दिक आणि मुंबई इंडियन्स संघाला जास्मिन चीअर करताना दिसली. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बसमध्येही दिसली. विशेष म्हणजे, फक्त क्रिकेट संघ आणि त्यांचे जवळचे मित्र या बसमध्ये बसू शकतात. आयपीएल फ्रेंचायझी हॉटेलपासून स्टेडियम किंवा एअरपोर्टपर्यंतच्या प्रवासासाठी खेळाडूंच्या बससह कुटुंबियांसाठीही व्यवस्था करते. सामन्यानंतर जास्मिन वालिया खेळाडूंचा कोचिंग स्टाफ आणि कुटुंबिय प्रवास करत असलेल्या बसमध्ये बसली.

बसमध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे कुटुंबिय चढत होते. जास्मिनच्या आधी दीपक चाहरची पत्नी जया भारद्वाज बसमध्ये चढली. त्यानंतर जास्मिन तिच्या मागोमाग बसमध्ये चढली. जास्मिनने एक लांब काळा ड्रेस घातला आहे आणि बसच्या मागच्या सीटवर बसली. जास्मिन बसमध्ये चढल्याने हार्दिक आणि तिच्या नात्याबद्दल चर्चांना आणखी जोर मिळाला आहे. गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी चार वर्षांचा संसार मोडल्याचं घोषित केलं होतं. दोघांनी इंस्टाग्रामवर याबाबतची घोषणा करत वेगळं होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हार्दिक पांड्या जास्मिन वालियासोबत दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Snehkumar Zala (@snehzala)

जास्मिन वालिया भारताच्या मोठ्या सामन्यांमध्येही उपस्थित होती. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही तिने हजेरी लावली होती. जास्मिन वालियाने गाणं आणि टेलिव्हिजन कारकिर्दीद्वारे मनोरंजन क्षेत्रात एक एक ठसा उमटवला आहे. तिचं बॉम डिगी गाणं खूपच लोकप्रिय झाले आहे. तसेच विविध रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. हार्दिक पांड्यासोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.  यापूर्वी जास्मिन वालियाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात तिच्या बाजूला टॅटू असलेला हात दिसला होता. तेव्हाही तो हार्दिक पांड्या असावा अशी चर्चा रंगली होती. मात्र त्या दोघांनीही या नात्याबाबत अधिकृत काहीच सांगितलं नसून या फक्त सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चा आहेत.

Follow Us
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?