इंग्लंडच्या Joe Root चा शतकी धमाका, शिखर धवनचा रेकॉर्ड ब्रेक, वर्ल्ड कप विनर कॅप्टनला पछाडलं
Joe Root Record : जो रुट याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कार्डीफ येथील सोफीया गार्डन्स येथे शतक झळकावलं. रुटने या शतकी खेळीसह महारेकॉर्ड केला आहे. त्याने 2 दिग्गज माजी कर्णधारांचा विक्रम मोडीत काढला आहे.

इंग्लंडचा अनुभवी आणि स्टार फलंदाज जो रुट याने त्याचा तडाखा कायम ठेवत वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. जो रुटने या शतकासह इतिहास घडवला आहे. रुटने या शतकी खेळीसह तब्बल 3 दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रुटने 309 धावांचा पाठलाग करताना ही विक्रमी खेळी साकारली आहे. रुटने नक्की कोणता विक्रम केला आहे? हे जाणून घेऊयात.
जो रुटने इंग्लंडच्या डावातील 36 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकत हे शतक पूर्ण केलं. रुटच्या या शतकानंतर त्याच्या या खेळीसाठी सहकाऱ्यांनी आणि क्रिकेट चाहत्यांनी उभं राहून त्याचं अभिनंदन केलं. रुटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 18 वं तर 54 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. रुटने यासह टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन याच्या 17 शतकांचा विक्रम मोडीत काढला. तसेच रुटने विंडीजचा दिग्गज माजी कर्णधार ब्रायन लारा याच्या 53 आंतरराष्ट्रीय शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. तर श्रीलंकेच्या महिला जयवर्धनेच्या 54 शतकांच्या विक्रमांची बरोबरी केली.
जो रुटचा झंझावात सुरुच, विंडीज विरुद्ध महारेकॉर्ड
ODI century number 1️⃣8️⃣
🗣️ “You can count on Joe Root.”
🤝 @IGcom pic.twitter.com/tAyz5T74I6
— England Cricket (@englandcricket) June 1, 2025
इंग्लंडसाठी वनडेत सर्वाधिक धावा
जो रुट याने या शतक खेळी दरम्यान महारेकॉर्ड केला. रुट इंग्लंडसाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रुटने यासह 2019 वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन याचा रेकॉर्ड ब्रेक केला.तसेच जो रुट इंग्लंडसाठी वनडे क्रिकेटच्या इतिहासात 7 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.
