जोफ्रा आर्चरचं टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यापूर्वी खुलं चॅलेंज! म्हणाला…

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने भारताने 7 गडी राखून जिंकला. यासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पण हा विजय नशिबाने मिळाल्याचं वक्तव्य इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने केलं आहे. तसेच पुढच्या सामन्यात 40 वर 6 विकेट अशी स्थिती असेल असं सांगायलाही विसरला नाही.

जोफ्रा आर्चरचं टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यापूर्वी खुलं चॅलेंज! म्हणाला...
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 4:00 PM

कोलकात्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. खरं तर या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतला. मात्र दारूण पराभव झाल्यानंतरही इंग्लंडच्या गोलंदाजाच्या डोक्यात भलतंच सुरु आहे. हा विजय भारताला नशिबाने मिळाला असं बेताल वक्तव्य इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने केलं आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात टीम इंडियाला जागा दाखवू असं आव्हानही दिलं आहे. जोफ्रा आर्चर म्हणाला की, ‘कोलकात्याची स्थिती गोलंदाज म्हणून माझ्यासाठी अनुकूल होती. आमच्या दुसऱ्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. पण भारताचे फलंदाज नशिबवान होते. त्यांनी जे काही उत्तुंग फटके मारले ते अशा जागी पडले तिथे खेळाडू नव्हते. पुढच्या सामन्यात आम्ही झेल पकडू आणि भारताची 40 धावांवर 6 विकेट अशी स्थिती करू.’ या सामन्यात अभिषेक शर्माचा झेल सुटला आणि तिलक वर्माविरुद्ध काही संधी निर्माण झाल्या होत्या. इंग्लंडकडून आर्चरने 4 षटकात 21 धावा देत 2 बळी घेतले.

पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 132 धावांवर गारद झाला होता. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 68 धावा केल्या होत्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 बळी घेतले.प्रत्युत्तरात अभिषेकच्या (79) खेळीमुळे भारताने 12.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ‘भारतात फलंदाज गोलंदाजांवर वरचढ होतात. असं अनेकदा आयपीएलमध्ये पाहिलं गेलं आहे. त्यामुळे गोलंदाजांना मेहनत करावी लागते.’ असं जोफ्रा आर्चर म्हणाला. जर कोलकात्यात काही विकेट झटपट बाद करण्यात यश मिळालं असतं नक्कीच विजय मिळवू शकलो असतो, असं सांगण्यासही तो विसरला नाही.

दुसरा टी20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. आता मालिकेतील दुसरा टी20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. इंग्लंडला टी20 मालिकेत कमबॅक करण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. अन्यथा मालिकेत कमबॅक करणं खूपच कठीण होईल. 2012 पासून भारतीय टी20 मालिकेत इंग्लंडवर भारी पडला आहे.

दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे.
'कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100%...', ठाकरेंच्या 9 खासदारांची कबुली
'कुणी तरी पुडी सोडली पण आम्ही 100%...', ठाकरेंच्या 9 खासदारांची कबुली.