IND vs ENG : रोहित शर्माला मोठा झटका, विराटला धोका, काय झालं?

Rohit Sharma Virat Kohli : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मात्र टीम इंडियाचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना झटका लागला आहे.

IND vs ENG : रोहित शर्माला मोठा झटका, विराटला धोका, काय झालं?
virat kohli and rohit sharmaImage Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 12:47 PM

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने बुधवारी 22 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात धमाकेदार विजय मिळवला. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 133 धावांचं आव्हान हे 12.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. अभिषेक शर्मा हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. अभिषेकने या सामन्यात 34 बॉलमध्ये 5 फोर आणि 8 सिक्ससह 79 रन्सची स्फोटक खेळी केली. तर इंग्लंडचा डाव हा 132 धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी कॅप्टन जोस बटलर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बटलरने 44 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. तर इतर फलंदाजांना 20 धावाही करता आल्या नाहीत.

जोस बटलर याने टीम इंडिया विरुद्ध केलेल्या अर्धशतकी खेळीसह मोठा कारनामा केला. बटलरच्या या खेळीमुळे रोहित शर्माला मोठा झटका लागला आहे. तर विराटवर टांगती तलवार आहे. बटलरने टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर विराटच्या विक्रमाची बरोबरी केली.

बटलरकडून रोहितचा रेकॉर्ड ब्रेक

बटलरने सलामीच्या सामन्यात 44 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. बटलरने या खेळीत 2 सिक्स आणि 8 फोर लगावले. बटलरने यासह रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला. बटलर इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20I मालिकेत सर्वाधिक अर्धशतकं करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच बटलरने विराटच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बटलरच्या कारकीर्दीतील टीम इंडियाविरुद्धची ही पाचवी अर्धशतकी खेळी ठरली. तर रोहितने इंग्लंडविरुद्ध 4 वेळा अर्धशतक झळकावलं आहे.

इंडिया-इंग्लंड टी 20I सीरिजमध्ये सर्वाधिक अर्धशतकं

  • जोस बटलर : 5
  • विराट कोहली : 5
  • रोहित शर्मा : 4
  • एलेक्स हेल्स : 3

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर.
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.