AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीला चढली धार, 9 विकेट घेत विरोधी संघाचं मोडलं कंबरडं

अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या रेड बॉल स्पर्धेत त्याने गोलंदाजीची कमाल केली. पाच विकेटसह सामन्यात एकूण 9 गडी बाद केले. तसेच गोवा क्रिकेट असोसिएशनला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

Video : अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीला चढली धार, 9 विकेट घेत विरोधी संघाचं मोडलं कंबरडं
| Updated on: Sep 16, 2024 | 7:59 PM
Share

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या गोलंदाजीची धार पुन्हा एकदा क्रीडारसिकांना अनुभवता आली. कर्नाटकमध्ये डॉक्टर के थिमाप्पिया मेमोरियन स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून मैदानात उतरला आहे. केएससीए इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने भेदक गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीमुळे गोवा संघाने एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवला. अर्जुन तेंडुलकरने गोवा क्रिकेट असोसिएशनसाठी एकूण 9 विकेट घेतले. पहिल्या डावात पाच गडी बाद केले आणि दुसऱ्या डावात 4 चार गडी बाद करत एकूण 9 विकेट घेतले. अर्जुनच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना केएससीए इलेव्हन संघ पुरता हतबल झाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या डावात 41 धावा देत त्याने पाच गडी बाद केले. विशेष म्हणजे आघाडीच्या पाच फलंदाजांपैकी चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. तसेच अक्षन रावची विकेट घेत पाच विकेट पूर्ण केल्या.

केएससीए इलेव्हन संघ पहिल्या डावात फक्त 103 धावा करू शकला. प्रत्युत्तरात गोवा क्रिकेट असोसिएशनने पहिल्या डावात 413 धावांची खेळी केली. यात अभिनव तेजरानाने 109 धावांची खेळी केली. तसेच मंथन खुटकरने 69 धावा केल्या. तर अर्जुन तेंडुलकरचं 18 धावांचं योगदान राहिलं. त्यामुळे गोवा क्रिकेट असोशिएशनकडे 310 धावांची मजबूत आघाडी आली. दुसऱ्या डावात या धावांचा पाठलाग करताना केएससीए इलेव्हन फक्त 121 धावांवर सर्वबाद झाली. या डावात अर्जुन तेंडुलकरने 55 धावा देत 4 विकेट घेतल्या. अर्जुन तेंडुलकरने आपल्या कामगिरीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

पुढच्या महिन्यात रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. हे पर्व अर्जुन तेंडुलकरसाठी खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी अर्जुन तेंडुलकरला आपला फॉर्म दाखवावा लागेल. तरच पुढच्या स्पर्धेचा मार्ग मोकळा होईल. अर्जुन तेंडुलकरने फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमध्ये 13 सामने खेळले असून 21 विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीतही अर्जुनने कमाल केली आहे. अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीत एक शतक ठोकलं असून 481 धावा केल्या आहेत.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.