AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी प्रशिक्षकाच्या मदतीला कपिल देव धावून आले, म्हणाले माझी पेन्शन घ्या आणि…

भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांना कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मात्र आता आर्थिक स्थिती खालावली असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा स्थितीत माजी क्रिकेटपटू कपिल मदतीसाठी समोर आले आहे.

माजी प्रशिक्षकाच्या मदतीला कपिल देव धावून आले, म्हणाले माझी पेन्शन घ्या आणि...
| Updated on: Jul 13, 2024 | 2:48 PM
Share

माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविलेले अंशुमन गायकवाड यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना कर्करोगाचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांना ब्लड कँसर असून त्यांच्या गेल्या एक वर्षापासून लंडनच्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र उपचारादरम्यान त्यांची आर्थिक स्थिती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावं अशी मागणी माजी क्रिकेटपटूंनी केली होती. मात्र बीसीसीआयकडून त्यांच्या आव्हानाला अजूनतरी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कपिल देव यांनी अंशुमन गायकवाड यांना उपचारासाठी आपली पेन्शनची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

कपिल देव यांनी क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितलं की, “मी खूप दु:खी आणि निराश आहे. मला दु:ख होतंय की मी आशूसोबत खेळलो आहे. त्याची अशी परिस्थिती मी पाहू शकत नाही. कोणालाही अशा वेदना होऊ नयेत. मला खात्री आहे की बोर्ड त्याची काळजी घेईल. आमही कोणावरही जबरदस्ती करत नाही. पण आशुसाठी मदत मनापासून झाली पाहीजे. काही घातक गोलंदाजांसमोर उभं असताना त्याच्या चेहरा आणि छातीवर दुखापत झाली आहे. आता त्याच्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. मला विश्वास आहे की क्रिकेट फॅन्स निराश करणार नाहीत. क्रीडारसिकांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.”

माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी सांगितलं की, “दुर्दैवाने आमच्याकडे काही सिस्टम नाही. हे चांगलं आहे की, आजकाल क्रिकेटपटू चांगले पैसे कमवत आहेत. सपोर्ट स्टाफलाही चांगला पैसा मिळत आहे. आमच्या काळात बोर्डाकडे पैसे नव्हते. आज त्यांच्याकडे पैसा आहे तर त्याने जुन्या खेळाडूंची काळजी घ्यायला हवी. पण ते आपलं योगदान कुठे देतात? जर एक ट्रस्ट बनवली असती तर ते आपला पैसा त्यात ठेवला असता. पण आमच्याकडे सिस्टम नाही. एक ट्रस्ट असली पाहीजे. मला वाटतं की बीसीसीआय असं करू शकते. या माध्यमातून माजी खेळाडूंची देखभाल करू शकतात. जर त्यांचं कुटुंबियांची परवानगी असेल तर मी माझं पेन्शन दान करून मदतासाठी तयारा आहे.”

कोण आहेत अंशुमन गायकवाड?

71 वर्षीय गायकवाड यांनी 80 च्या दशकात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतासाठी 40 कसोटी सामने खेळणाऱ्या अंशुमनने 1 द्विशतक, 2 शतके आणि 10 अर्धशतकांसह 1985 धावा केल्या आहेत. तसेच 15 वनडे सामन्यात 1 अर्धशतकासह 269 धावा केल्या आहेत. अंशुमन गायकवाड यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. 1997 ते 2000 या काळात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना एक मजबूत भारतीय संघ तयार केला. या काळात भारतीय संघाने शारजाहमधील प्रसिद्ध कोका-कोला कप आणि पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटी जिंकली होती.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....