AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election: महाविकासआघाडीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोण किती जागांवर लढणार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधानपरिषद जागांसाठी महाविकास आघाडीचे (MVA) १५ जागांवर एकमत झाले असून काँग्रेस ८, ठाकरे गट ४ तर राष्ट्रवादी ३ जागांवर लढणार आहे; नांदेड आणि नाशिकाचा तिढा कायम आहे.

Vidhan Parishad Election: महाविकासआघाडीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोण किती जागांवर लढणार?
MVA
| Updated on: May 29, 2026 | 3:04 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे महायुती आणि महाविकासआघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाविकासआघाडीने या सर्व १७ जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मविआच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण १७ जागांपैकी १५ जागांवर जागावाटपाचे एकमत झाले असून, उर्वरित दोन जागांबाबत येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

नुकतंच मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकासआघाडी सर्व जागा लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार हे आता स्पष्ट झाले आहे.

जागावाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित

मविआच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील १५ जागांचा तिढा सुटला असून पक्षांनुसार संभाव्य जागावाटप खालीलप्रमाणे असणार आहे. यात काँग्रेस ८, शिवसेना ठाकरे गट ४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ३ जागांवर निवडणूक लढणार आहे.

  • काँग्रेस (०८ जागा): चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूरची पोटनिवडणूक.
  • शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (०४ जागा): रत्नागिरी, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर.
  • राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट (०३ जागा): पुणे, ठाणे, आणि सातारा-सांगली.

नाशिक आणि नांदेडवरून पेच कायम

या १५ जागांवर एकमत झाले असले तरी नाशिक आणि नांदेड या दोन मतदारसंघांवर मविआतील तिन्ही पक्षांनी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आपला दावा ठोकला आहे. यामुळे या दोन जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत यावर पुन्हा एक बैठक घेऊन यावर सर्वसंमतीने अंतिम तोडगा काढला जाईल, अशी माहिती नेत्यांनी दिली आहे.

“विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. आजची जागावाटपाची चर्चा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. दोन जागा वगळता इतर सर्व जागांवर एकमत झाले आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आम्ही सर्व जण पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला