AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाची नवी तारीख आली, आधी केरळ मगच कोकण; हवामान विभागाची मोठी अपडेट काय?

मान्सूनच्या आगमनाची नवीन तारीख जाहीर झाली आहे. केरळमध्ये आता ४ जूनला मान्सून दाखल होईल, त्यामुळे महाराष्ट्रातही तो उशिरा पोहोचणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाऱ्यांचा वेग मंदावल्याने मान्सूनची गती थांबली आहे.

Monsoon Update : मान्सूनच्या आगमनाची नवी तारीख आली, आधी केरळ मगच कोकण; हवामान विभागाची मोठी अपडेट काय?
मान्सूनबद्दल हवामान विभागाची मोठी अपडेट
| Updated on: May 29, 2026 | 2:18 PM
Share

आज येईल उद्या येईल म्हणून ज्याची वाट पाहिली जात आहे, तो मान्सून अजून काही येण्याची चिन्हे दिसत नाही. आधी मान्सून 1 जून रोजीच केरळमध्ये दाखल होणार असल्याची बातमी आली. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हात थंड वाऱ्याची झुळूक यावी तसा भास नागरिकांना झाला. पण अचानक उन्हाचा जोरात फटका बसावा, अशीच एक बातमी येऊन धडकली आहे. मान्सून लांबल्याचं सांगण्यात आलं आहे. आता मान्सूनच्या आगमनाची नवीन तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रम निरास झाला असला तरी मान्सून आता ठरलेल्या वेळेत येऊन सुखावेल, अशी त्यांची भावना झाली आहे.

देवभूमी अर्थात केरळमध्ये मान्सून आगमनाची आता नवीन तारीख समोर आली आहे. 26 एप्रिल रोजी देवभूमीत येणारा मान्सून आता 4 जूनला पोहोचण्याची शक्यता आहे. देशातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचा वेग मंदावला आहे. अंदमान आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन रेंगाळला आहे. 3 ते 4 जूनला देवभूमीत मान्सून पोहोचणार असल्यानं महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

गती मंदावली

मान्सूनची वाटचाल मंदावली या स्थितीला मान्सून मृदू आगमन असे संबोधले जाते. बंगालच्या उपसागरातील चक्राकार परिस्थितीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना खेचणारी यंत्रणा तयार झाली आहे. त्यामुळे बाष्प आणि भरलेले नैऋत्य मोसमी वारे कमकुवत पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मान्सूनची आगे कुछ होणारी गती मंदावली आहे.

वारे वाहणार

दरम्यान, संपूर्ण कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेसह अधूनमधून वादळी पावसाचा मारा होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 29 मे ते 1 जूनपर्यंत किनारपट्टी भागात हीच स्थिती कायम राहणार आहे. दुपारपर्यंत तापमानाचा पारा चढता आणि त्यानंतर सायंकाळच्या सत्रात पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

पारा वाढणार

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. यंदा मान्सून लांबण्याची चिन्ह आहेत. मात्र, किनारपट्टी भागातील हवेतील आद्रता वाढली आहे. समुद्राकडून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेतील कोरडेपणा वाढला आहे. येत्या चार दिवसात तापमानाचा पारा 3 ते 4 अंशाने वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत रविवारी, सोमवारी कोसळधार

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नागरिक असह्य उकाड्याने त्रस्त आहेत. तापमानासोबतच हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना प्रचंड घाम आणि उष्णतेचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आणि सोमवारी मुंबईत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. या प्री-मान्सून सरींमुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या मुंबईतील कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात असून आर्द्रतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे दिवसभर दमट वातावरण जाणवत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास होत असून रस्त्यांवरही तुलनेने कमी वर्दळ दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणात बदल होत असून पुढील दोन दिवसांत मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना काळजी घेणे आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला