AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karun Nair : भारत-विंडीज कसोटी मालिकेदरम्यान करुण नायरचं कमबॅक, निवड समितीचा निर्णय

Karun Nair : टीम इंडियाचा फलंदाज करुण नायर याला वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेतून डच्चू देण्यात आला होता. मात्र आता या मालिकेदरम्यान करुणबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या.

Karun Nair : भारत-विंडीज कसोटी मालिकेदरम्यान करुण नायरचं कमबॅक, निवड समितीचा निर्णय
| Updated on: Oct 07, 2025 | 1:00 AM
Share

क्रिकेटकडे एक संधी मागणाऱ्या करुण नायर याला इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआय निवड समितीने संधी दिली. मात्र करुण नायर याला या संधीचं सोनं करुन संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी दावा ठोकता आला नाही. करुणला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. करुणने या दौऱ्यात फक्त 1 अर्धशतक केलं. त्यामुळे करुणचा वेस्ट इंडिज विरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पत्ता कट होणार हे निश्चित होतं. अखेर तसंच झालं. करुणला या मालिकेतून वगळण्यात आलं. या मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. भारताने अडीच दिवसांतच सामना जिंकला. त्यानंतर आता 6 ऑक्टोबरला करुण नायरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

करुणचा देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी जुन्या संघात समावेश करण्यात आला आहे. करुण 2 वर्षांनंतर कर्नाटकसाठी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेतील एलीट ग्रुपमधील सामन्यांना 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. कर्नाटक या स्पर्धेतील आपला सलामीचा सामना हा सौराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. हा सामना राजकोटमध्ये होणार आहे. करुणला या सामन्यासाठी कर्नाटक संघात स्थान देण्यात आलं आहे.

करुण या आधी कर्नाटकाची साथ सोडून विदर्भाकडून खेळला. करुणने विदर्भाचं 2 हंगामात प्रतिनिधित्व केलं. तसेच विदर्भाने गेल्या हंगामात रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. करुणने विदर्भाला चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्याच कामगिरीच्या जोरावर करुणला भारतीय कसोटी संघात 8 वर्षांनी पुनरागमनाची संधी देण्यात आली होती.

करुणची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

करुणला इंग्लंड दौऱ्यात 4 कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. करुणने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील 8 डावांमध्ये 25.62 च्या सरासरीने आणि 52.56 या स्ट्राईक रेटने एकूण 205 धावा केल्या. यात 1 अर्धशतकाचा समावेश होता. करुणने या दरम्यान 29 चौकार लगावले. मात्र या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला विंडीज विरुद्ध कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली नाही. आता करुण आपल्या जुन्या संघाकडून कमबॅक करताना आधीसारखाच फॉर्म कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्नाटक क्रिकेट टीम : मयंक अग्रवाल (कर्णधार), करुण नायर, आर स्मरण, केएल श्रीजीत (विकेटकीपर), श्रेयस गोपाल, विशक विजयकुमार, विद्वथ कावेरप्पा, अभिलाष शेट्टी, एम वेंकटेश, निकिन जोस, अभिनव मनोहर, कृतिक कृष्णा (विकेटकीपर), केवी अनीश, मोहसिन खान आणि शिखर शेट्टी.

अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?.
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट.
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी.
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.