KKR vs DC, IPL 2022 : ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरमध्ये वर्चस्वाची लढाई, दोघांकडून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न
आज आयपीएलच्या दिल्ली आणि कोलकाताच्या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळेल. कारण, 2020 मध्ये कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने लीगमधील आपली सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता दिल्लीचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे हाती आहे. दोन्ही कर्णधारांना एकमेकांची रणनीती आणि प्रत्येक पैलू चांगलेच माहीत आहेत.
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) दुपारच्या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळेल. कारण, 2020 मध्ये कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Ayyer) नेतृत्वाखाली दिल्लीने लीगमधील आपली सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता दिल्लीचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे (Rushabh Pant) हाती आहे. दोन्ही कर्णधारांना एकमेकांची रणनीती आणि प्रत्येक पैलू चांगलेच माहीत आहेत. दोघेही तरुण असून ते भारताचे भावी कर्णधारही मानले जातात. अशा परिस्थितीत दोघेही प्रत्येक आघाडीवर स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.कोलकाताने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुरेश रैनाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. आज होणाऱ्या सामन्यात श्रेयस आणि ऋषभ पंत यांच्यात वर्चस्वाची लढाई पहायला मिळू शकते.
कोण किती सामने जिंकले?
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट राईडर्सचा संघ टॉपला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटलचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना कोणाचं पारडं जड करतो, ते पाहणं महत्वाचं ठरेल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत एकूण सामने 29 सामने सोबत खेळले आहेत. त्यापैकी दिल्ली कॅपिटल्सने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने 16 सामन्यात विजय मिळवला आहे.
खेळपट्टी आणि हवामान
ब्रेबॉर्नच्या खेळपट्टीवर खेळले गेलेले चार सामने उच्च स्कोअरिंग आणि रोमांचक होते. इथे नाणेफेकीची भूमिका विशेष राहिली नाही. कारण प्रथम फलंदाजी करणारा संघही जिंकला आणि नंतर फलंदाजी करणारा संघ देखील जिंकला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.
केकेआरची फलंदाजी अधिक मजबूत
कोलकाताकडे आठव्या क्रमांकापर्यंत एक फलंदाज आहे, ज्याचे वैशिष्ट्य पॅट कमिन्सने गेल्या सामन्यात सादर केले होते. गोलंदाजीच्या आघाडीवरही दिल्लीवर केकेआरचे पारडे जड दिसत आहे. केकेआरच्या पॉवरप्लेमध्ये उमेश यादव खूप प्रभावी ठरला आहे. दिल्लीचा विचार करता, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्टजेच्या पुनरागमनानंतरही गोलंदाजी ही कमकुवत दुवा ठरली आहे.
खेळपट्टी आणि हवामान
ब्रेबॉर्नच्या खेळपट्टीवर खेळले गेलेले चार सामने उच्च स्कोअरिंग आणि रोमांचक होते. इथे नाणेफेकीची भूमिका विशेष राहिली नाही कारण प्रथम फलंदाजी करणारा संघही जिंकला आणि नंतर फलंदाजी करणारा संघ. उष्णता एक समस्या असू शकते.
इतर बातम्या
कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, डाळिंब बागाचे नुकसान अन् हंगाम संपल्यानंतर आता कीड नियंत्रणाचे धडे
Pune : भावना दुखावण्याचं कारण पुढे करत पोलिसांनी रद्द केला पुण्यात होणारा नास्तिक मेळावा