KKR vs LSG, Prediction, Playing 11 : आज कोलकाता विरुद्ध लखनौ सामना, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेवन

केकेआर काय करणार? शेल्डन जॅक्सनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये बोलावण्याचा आणि सॅम बिलिंग्सला सलामी देण्याचा पर्याय संघाकडे आहे.

KKR vs LSG, Prediction, Playing 11 : आज कोलकाता विरुद्ध लखनौ सामना, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेवन
आज कोलकाता विरुद्ध लखनौ सामनाImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 8:50 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये अगदी शेवटचा टप्पा सुरू आहे. प्रत्येक संघ आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. ज्यामुळे शेटच्या चार संघांचे चित्र स्पष्ट होईल. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या भागामध्ये प्रथम स्पर्धा करतील. आज नवी मुंबईमध्ये दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यात कोलकाता प्लेऑफसाठी आपला दावा कोणत्याही प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहे. सलग दोन सामने जिंकून आपल्या आशा जिंवत ठेवणाऱ्या केकेआरसाठी हे सोपं आव्हान नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना मजबूत प्लेइंग इलेवनची आवशकता असणार आहे. त्याचवेळी सलग दोन पराभवानंतर लखनौमध्येही काही बदल होताना दिसत आहेत. आता आजच्या सामन्यात नेमकं काय होतं, याकडे देखील लक्ष असणार आहे.

डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार हा सामना कोलकातासाठी अधिक महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ आपला पूर्ण जोर लावू इच्छितो. गेल्या दोन सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स आणि नंतर सनरायजर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला. कोलकाताने गेल्या सामन्यात काही बदल केले होते. त्यात कमिन्सच्या दुखापतीमुळे मजबुरीत बदल करण्यात आला होता. सलामीवीर अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे बाहेर असल्यानं आता या सामन्याचीही तीच परिस्थिती आहे. त्याच्या जागी दुसऱ्याला खेळावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

कोण असेल केकेआरचा सलामीवीर?

कोलकाताकडे दुसरा आघाडीचा सलामीवीर म्हणून आरोन फिंचचा पर्याय आहे. पण संघात चार परदेशी खेळाडूंचा कोटा आधीच निश्चित आहे आणि या दौघांनी देखील शेवटच्या सामन्यातील विजयता महत्वाची भूमिका बावली. त्यामुळे त्यांना बदलणे अघड आहे. मग केकेआर काय करणार? शेल्डन जॅक्सनला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये बोलावण्याचा आणि सॅम बिलिंग्सला सलामी देण्याचा पर्याय संघाकडे आहे. याशिवाय इतर कोणतेही बदल अपेक्षित नाहीत.

मनीख पुन्हा एलएसजीमध्ये?

लखनौचा विचार करता संघाला सलग दोन सामन्यांत दणदणीत पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यात एलएसजीची फलंदाजी खराब झाली. विशेषत: कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक ही सलामीची जोडी कोणताही प्रभाव पाडू शकली नाही. येथे कोणताही बदल होणार नाही. परंतु मधल्या फळीला पूर्ण क्षमतेने कागमगिरी करता आली नाही. युवा फलंदाज आयुष बडोनीने चांगली सुरुवात केल्यानंतरही विशेष कामगिरी दाखवली नाही. अशा परिस्थितीत त्याच्या कृष्णप्पा गौतमला मैदानात उतरवले जाऊ शकते. जो गोलंदाजीसोबत फलंदाजीसाठी मदत करू शकतो. तसेच मनीष पांडेचे पुनरागमनही शक्य आहे. गोलंदाजीत बदल करण्याची गरज नाही.

संभाव्य प्लेइंग इलेवन

कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार) व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव,वरुण चक्रवर्ती

लखनौ सुपर जायंट्स : केएल राहुल (कर्णधार) क्विंटन डी कॉक, दीपक हुड्डा, मनीष पांडे, कृष्णप्पा गौतम, मार्कस स्टॉइनिस, कृष्णाल पंड्या, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.