AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: भारताला झटका, दुखापतीमुळे दोन प्रमुख खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूला संधी

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 सीरीजआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी झाले आहेत.

IND vs WI: भारताला झटका, दुखापतीमुळे दोन प्रमुख खेळाडू टी-20  मालिकेतून बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूला संधी
9 फेब्रुवारीला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे. या मालिकेची सुरुवात व्हायला आता काही दिवसच बाकी असताना भारतीय संघ कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो साभार - twitter/bcci)
| Updated on: Feb 11, 2022 | 9:07 PM
Share

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी टी 20 सीरीजआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचे दोन प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळू शकणार नाहीत. उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेल (Axar patel) फिटनेसमुळे टी-20 सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीत. राहुलला दुसऱ्या वनडे दरम्यान दुखापत झाली होती. अक्सर पटेल कोरोनामधून  सावरतोय. “9 फेब्रुवारीला दुसऱ्या वनडे दरम्यान उपकर्णधार केएल राहुलला दुखापत झाली होती. अक्सर पटेल कोरोनामधून सावरतोय. दोघेही आपल्या फिटनेसवर काम करण्यासाठी आता बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत जातील” असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांच्या जागी नव्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि ऑलराऊंडर दीपक हुड्डाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या दोन खेळाडूंना मिळाली जागा ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुड्डा दोघेही वनडे सीरीजचा भाग होते. ऋतुराजला वनडे सीरीजआधी कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. दीपक हुड्डाने याच मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने दोन्ही वनडेमध्ये समाधानकारक कामगिरी केली आहे.

श्रीलंका सीरीजद्वारे करु शकतात पुनरागमन केएल राहुल फक्त दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळला. बहिणीच्या लग्नामुळे तो पहिल्या वनडेमध्ये नव्हता. दुसऱ्या वनडेत त्याने 49 धावांची खेळी केली. दुखापतीमुळे आजच्या तिसऱ्या वनडेत तो खेळू शकला नाही. राहुल आणि अक्सर महिनाअखेरीस श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेद्वारे पुनरागमन करु शकतात.

टी20 सीरीजसाठी भारतीय टीम रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड़ आणि दीपक हुड्डा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.