AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावावर 15 मोठे रेकॉर्ड, मोडणं खूपच कठीण

वैभव सूर्यवंश आता 15 वर्षांचा झाला आहे. या 15 वर्षांच्या कालावधीतच त्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली. काही विक्रम तर असे आहेत की ते मोडणं खूपच कठीण आहे. चला जाणून घेऊयात.

Vaibhav Sooryavanshi : 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावावर 15 मोठे रेकॉर्ड, मोडणं खूपच कठीण
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावावर 15 मोठे रेकॉर्ड, मोडणं खूपच कठीणImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 27, 2026 | 8:52 PM
Share

भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जात आहे. वैभव सूर्यवंशीने कमी वयातच अनेक विक्रम रचले आहे. आता वैभव सूर्यवंशी हा 15 वर्षांचा झाला आहे. 27 मार्च रोजी त्याने 15 वर्ष पूर्ण केलं आहे. तसं पाहिलं तर हे वय शिकण्याचं असतं. पण या शिकण्याच्या वयातच वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम रचले आहेत. या विक्रमांची चर्चा भविष्यातही रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेत गेल्या वर्षीच त्याने पदार्पण केलं होतं आणि पदार्पण केल्यानंतर त्याने विक्रमला गवसणी घातली होती. आता पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीच्या 15व्या वाढदिवशी आपण त्याच्या 15 मोठ्या विक्रमांबाबत जाणून घेऊयात.

वैभव सूर्यवंशीचे 15 मोठे विक्रम

  1. वैभव सूर्यवंशी आयपीएल स्पर्धेच्या मेगा लिलावात चर्चेत आला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटींना विकत घेतलं होतं. तेव्हा त्याचं वय फक्त 13 वर्षे आणि 8 महिने होतं.
  2. वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना खेळला होता. या स्पर्धेत खेळणारा सर्वात तरूण खेळाडू म्हणून विक्रम नोंदवला गेला. तेव्हा फक्त 14 वर्षे आणि 23 दिवसांचा होता.
  3. वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या करियरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. यासह या स्पर्धेच्या इतिहासात षटकार मारणारा सर्वात तरूण फलंदाज ठरला होता.
  4. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने 14 वर्षे आणि 32 दिवसांचा असताना गुजरात टायटन्सविरुद्ध 38 चेंडूत 101 धावा केल्या होत्या.
  5. वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. आयपीएल स्पर्धेत भारतीय फलंदाजाने ठोकलेलं हे सर्वात वेगवान शतक आहे. आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेलने 30 चेंडूत शतक ठोकलं होतं.
  6. आयपीएलमध्ये एका डावात 11 षटकार ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने मुरली विजयाच्या षटकारांशी बरोबरी केली. त्याने एका डावात इतकेच षटकार ठोकले होते.
  7. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा आणि मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे. त्याने 2026 च्या अंतित सामन्यात इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूत 175 धावा केल्या होत्या.
  8. अंडर 19 च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने 15 षटकार ठोकले होते. युवा वनडे सामन्यातील एका डावात ठोकलेले सर्वाधिक षटकार आहेत.
  9. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत फक्त 14 वर्षे आणि 272 दिवसांचा असताना 36 चेंडूत शतक ठोकलं आहे.
  10. अरूणाचल प्रदेश विरूद्ध शतकीय खेळीत वैभव सूर्यवंशीने 59 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या होत्या. लिस्ट ए मध्ये सर्वात वेगाने 150 धावा करण्याचा विक्रम आहे. एबी डिव्हिलियर्सने 64 चेंडूत हा कारनामा केला होता.
  11. वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यात फक्त 52 चेंडूत शतक ठोकलं होतं. यूथ वनडे सामन्यातील हे वेगवान शतक आहे. त्याची क्रिकेट इतिहासात नोंद झाली आहे.
  12. वैभव सूर्यवंशीने युथ कसोटी सामन्यातही शतकी खेळी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघाविरुद्ध फक्त 58 चेंडूत शतक ठोकलं आहे.
  13. वैभव सूर्यवंशी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा दुसरा युवा फलंदाज आहे. त्याने 12 वर्षे आणि 282 दिवसांचा असताना रणजी ट्रॉफी पदार्पण केलं होतं.
  14. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अंडर 19 वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीने फक्त 15 अर्धशतक ठोकलं. युथ वनडे सामन्यातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने ऋषभ पंतचा 18 चेंडूत अर्धशतकाचा विक्रम मोडला.
  15. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी भारतीय खेळाडू ठरला. त्याने 13 वर्षे आणि 269 दिवसांचा असताना विजय हजारे ट्रॉफीत खेळला होता.

Follow Us
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त