RCB vs SRH, Head to Head: बंगळुरु आणि हैद्राबाद संघात आजची लढत, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यात आज सामना होणार आहे. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेली असून हैद्राबादचा स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे.

RCB vs SRH, Head to Head: बंगळुरु आणि हैद्राबाद संघात आजची लढत, असा आहे आतापर्यंतचा इतिहास
रॉयल चँलेजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 51 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायजर्स हैद्राबाद (SRH) या संघामध्ये आज सायंकाळी पार पडणार आहे. आरसीबी याआधीच प्लेऑफमध्ये गेली असून हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे. त्यामुळे सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा नसला तरी क्रिकेट रसिकांसाठी उत्तम खेळाची पर्वणी असेल हे नक्की!

यंदाच्या गुणतालिकेचा विचार करता आरसीबीचा संघ आतापर्यंत 12 सामने खेळला असून त्यातील 8 सामने विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 16 गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर हैद्राबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे कारण 12 पैकी केवळ 2 सामन्यात विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यात 4 गुण असून ते सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत.

आरसीबी विरुद्ध हैद्राबाद Head To Head

आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि हैद्राबाद हे संघ 19 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये हैद्राबाद संघाने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीचा संघ 8 वेळाच विजय मिळवू शकला आहे. तर एक सामना अनिर्णीत देखील सुटला आहे. आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

रॉयल चँलेजर्स बंगळुरु-विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, शाहबाज अहमद, जियॉर्जी गार्टन,  कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

सनरायजर्स हैद्राबाद – जेसन रॉय , रिद्धिमान साहा  (यष्टीरक्षक), मनिष पांडे, केन विल्यमसन (कर्णधार), अभिशेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा

हे ही वाचा-

IPL 2021 : जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर सगळेच संघ फेल, ‘कंजुषी’चे रेकॉर्ड मोडित

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

IPL 2021: इशानचं तुफानी अर्धशतक, मुंबईचा दणकेबाज विजय, राजस्थानला 8 गडी राखून दिली मात

(Know Head to head of todays match RCB vs SRH match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Royal challengers banglore vs Sunrisers Hyderabad)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI