AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: इशानचं तुफानी अर्धशतक, मुंबईचा दणकेबाज विजय, राजस्थानला 8 गडी राखून दिली मात

इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघातील सामन्यात मुंबईने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले. मुंबईने राजस्थानवर 8 गडी राखून धडाकेबाज विजय मिळवला आहे.

IPL 2021: इशानचं तुफानी अर्धशतक, मुंबईचा दणकेबाज विजय, राजस्थानला 8 गडी राखून दिली मात
इशान किशन
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 10:39 PM
Share

IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 51 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI)  या दोन संघामध्ये पार पडला. प्लेऑफमध्ये जाणाऱ्या चौथ्या संघाचं स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा सामना जिंकत मुंबईने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. तसंच गुणतालिकेतही झेप घेत थेट पाचवं स्थान मिळवलं आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला.

राजस्थानची फलंदाजी ढासळली

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने त्यांचे यंदाच्या पर्वातील सर्वात खराब फलंदाजीचे दर्शन घडवले. संपूर्ण संघ मिळून 20 षटकात केवळ 90 धावाचं करु शकला. संघाकडून सर्वाधिक धावा म्हणजे सलामीवीर एविन लुईसने केलेल्या 24 धावा ठरल्या. तो बाद झाल्यानंतर एकही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. कर्णधार संजूही आज 3 धावा करुन बाद झाला. तर श्रेयस गोपाल, कुलदिप यादव हे तर शून्य धावांवर बाद झाले. लुईसशिवाय यशस्वी (12), मिलर (15) आणि तेवतिया (12) यांनी काही धावा केल्या. इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. मुंबईकडून मात्र उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. नथान कुल्टर नाईलने 4, जेम्स नीशामने 3 आणि बुमराहने 2 विकेट्स घेतले.

इशानचं धडाकेबाज अर्धशतक आणि मुंबई विजयी

91 धावांचं सोपं लक्ष्य पार करताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण 22 धावा होताच चेतन सकारियाने त्याला बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमारही 13 धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण सलामीवीर इशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच होता. त्याने अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 50 धावा केल्या आणि सोबतच मुंबईला अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

चौथ्या स्थानासाछी केकेआर आणि मुंबईत चुरस

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

हे ही वाचा 

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(In MI vs RR match Mumbai Indian won Match against Rajsthan Royals with 8 wickets in Hands)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...