IPL 2021 : जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर सगळेच संघ फेल, ‘कंजुषी’चे रेकॉर्ड मोडित

आयपीएलमधील विद्यमान चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा हंगाम बराच संघर्षमय ठरला आहे. हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे.

IPL 2021 : जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर सगळेच संघ फेल, 'कंजुषी'चे रेकॉर्ड मोडित
Jasprit Bumrah
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 11:32 AM

दुबई : आयपीएलमधील विद्यमान चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) यंदाचा हंगाम बराच संघर्षमय ठरला आहे. हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. सध्या ते 13 सामन्यांत सहा विजयांसह पाचव्या स्थानावर आहेत. मंगळवारी मुंबईने राजस्थान रॉयल्सवर मोठ्या विजयासह प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. गुणांच्या बाबतीत सध्या मुंबई आणि केकेआर बरोबरीवर आहेत आणि दोन्ही संघांचा अजून एक सामना शिल्लक आहे. (IPL 2021 : MI pacer Jasprit Bumrah most dot balls against rajasthan royals)

मुंबईविरुद्ध राजस्थान सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी निवडली. हा निर्णय मुंबईसाठी 100% बरोबर ठरला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या 90 धावांवर रोखलं. ज्यामुळे मुंबईसमोर केवळ 91 धावांचे सोपे लक्ष्य होते. जे त्यांनी अवघ्या 8.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत पूर्ण केले. यावेळी संघाचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज असं अर्धशतक झळकावत मुंबईचा विजय सोपा केला.

या सामन्यातील विजयाचा पाया मुंबईच्या गोलंदाजांनी रचला. मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर नाईल आणि जेम्स निशम या तिघांनी राजस्थानविरोधात टिच्चून गोलंदाजी केली. या सामन्यात कुल्टर नाईल आणि निशम या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तरीदेखील बुमराहने या संघाचा प्रमुख गोलंदाज का आहे हे त्याच्या 4 षटकांच्या स्पेलवरुन लक्षात येईल.

बुमराहने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं.

जसप्रीत बुमराहने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत 14 धावा देऊन दोन बळी घेतले. या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 3.50 होता. त्याने या सामन्यात इव्हन लुईस आणि श्रेयस गोपालच्या विकेट्स घेतल्या. बुमराहच्या 24 चेंडूंपैकी 18 चेंडू डॉट होते. याचबरोबर तो मुंबई इंडियन्ससाठी एका सामन्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज ठरला. यापूर्वी यंदाच्या आयीएलच्या पहिल्या टप्प्यात पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या दीपक चाहरने आणि राजस्थान रॉयल्सच्या ख्रिस मॉरिसने केकेआरविरुद्ध प्रत्येकी 18-18 डॉट बॉल टाकले आहेत.

स्पर्धेत सर्वाधिक डॉट बॉल

यंदाच्या मोसमात बुमराह आतापर्यंत सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज बनला आहे. बुमराहने 13 सामन्यांमध्ये 134 डॉट बॉल टाकले आहेत. पंजाब किंग्जचा मोहम्मद शमी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने आतापर्यंत एकूण 131 डॉट बॉल टाकले आहेत. बुमराह सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

सध्या केकेआर आणि मुंबई दोघांनी 13 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण केकेआरचा नेट रनरेट +0.294 असून मुंबईचा -0.048 इतका आहे. त्यामुळे केकेआर चौथ्या आणि मुंबई पाचव्या स्थानावर आहे. यामुळेच दोन्ही संघाचा अखेरचा सामना अत्यंत महत्त्वाचा असून केकेआरचा सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्ससोबत तर मुंबईचा शुक्रवारी सनरायजर्स हैद्राबादसोबत होणार आहे.

इतर बातम्या

T20 world Cup ला मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्ती मुकणार?, दुखापतीनंतरही आयपीएलमधून माघार नाहीच, काय आहे नेमकं प्रकरण?

T20 world Cup 2021 पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका, स्टार ऑलराउंडर IPL मध्ये दुखापतग्रस्त, विश्वचषकालाही मुकणार

उत्तम T20 क्रिकेटर व्हायचंय?, कोहली किंवा गेलला नाही तर ‘या’ खेळाडूला फॉलो करा, माजी इंग्लंड कर्णधाराचा युवांना सल्ला

(IPL 2021 : MI pacer Jasprit Bumrah most dot balls against rajasthan royals)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.