RR vs MI, Head to Head: मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान, प्लेऑफच्या एन्ट्रीसाठी महत्त्वाचा सामना, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

आयपीएलच्या अंतिम सामन्याला काही दिवसचं शिल्लक असताना प्लेऑफमध्ये चौथा संघ कोणता जाणार? हे अजून स्पष्ट नाही. या चौथ्या स्थानासाठीच्या दृष्टीने आज महत्त्वाची लढत आहे.

RR vs MI, Head to Head: मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान, प्लेऑफच्या एन्ट्रीसाठी महत्त्वाचा सामना, असा आहे आतापर्यंतचा इतिहास
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Oct 05, 2021 | 4:01 PM

IPL 2021: आयपीएलच्या अंतिम सामन्याला आता काही दिवसच उरले आहेत. सध्या चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरू हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असून चौथ्या स्थानासाठी हैद्राबाद सोडता इतर संघामध्ये चुरशीची शर्यत आहे. याच दृष्टीने आज होणारा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स (RR vs MI) या दोन संघामधील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही संघाना मोठ्या विजयाची अपेक्षा असल्याने आजची लढत चुरशीची होईल.

दरम्यान दोन्ही संघाच्या सध्याच्या स्थानाचा विचार करता राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघानी 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांच्या खात्यात 10 गुण आहेत. पण राजस्थानचा नेट रनरेट -0.337 असून मुंबईचा नेट रनरेट -0.453 आहे. त्यामुळे राजस्थान सहाव्या तर मुंबई सातव्या स्थानावर आहे.

राजस्थान विरुद्ध मुंबई Head To Head

राजस्थान आणि मुंबई हे दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी मुंबई 12 तर राजस्थानने 11 सामने जिंकले आहेत. तसेच एक सामना अनिर्णीतही सुटला आहे. त्यामुळे दोघांची आतापर्यंतच्या सर्व लढती चुरशीची असल्यामुळे आजचा सामनाही रंगतदार होणार यात शंका नाही.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टीरक्षक),  एविन लुईस, यशस्वी जैसवाल, डेविड मिलर, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, माहिपार लोमरोर, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या,  कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

हे ही वाचा

IPL 2021: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय, गुणतालिकेतही मिळवलं अव्वल स्थान

हैद्राबाद संघाची फलंदाजी सर्वात रटाळ, पाहताना झोप लागते, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा हल्लाबोल

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी उत्तम, पण कर्णधार धोनीच्या नावे खराब रेकॉर्ड

(Know Head to head of todays match RR vs MI match and Know probable playing 11 for Todays IPL Match)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें