AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2022: ‘आता त्याच्यासाठी भरपूर पैसे मोजा’, अश्विनचा CSK ला इशारा, मागे त्याला फक्त 1.5 कोटींमध्ये घेतलं

खासकरुन CSK आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्याचा अन्य फ्रेंचायजींचा प्रयत्न असेल. कारण आयपीएलमधील हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत.

IPL Auction 2022: 'आता त्याच्यासाठी भरपूर पैसे मोजा', अश्विनचा CSK ला इशारा, मागे त्याला फक्त 1.5 कोटींमध्ये घेतलं
धोनी-अश्विन
| Updated on: Feb 10, 2022 | 1:10 PM
Share

चेन्नई: पुढच्या दोन दिवसात 12 आणि 13 फेब्रुवारीला IPL च्या 15 व्या हंगामासाठी बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन पार पडणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स (Lcuknow super giants) आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांमुळे IPL ऑक्शन अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. या मेगा ऑक्शनसाठी सर्वच फ्रेंचायजींनी तयारी केली आहे. प्रत्येक संघाची रणनिती ठरली आहे. प्रत्येक फ्रेंचायजीला चार खेळाडू रिटेन करता आले आहेत. त्यामुळे अनेक युवा टॅलेंटेड खेळाडू ऑक्शनसाठी उपलब्ध आहेत. एकूण 590 खेळाडू Mega Auction मध्ये आहेत. जुन्या खेळाडूंना पुन्हा संघासोबत जोडण्याचा प्रयत्न होईल. खासकरुन CSK आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्याचा अन्य फ्रेंचायजींचा प्रयत्न असेल. कारण आयपीएलमधील हे दोन सर्वात यशस्वी संघ आहेत.

CSK साठी त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे या ऑक्शनमध्ये एका स्टार फलंदाजाचा आपल्या जुन्या संघाकडून पुन्हा खेळण्याचा प्रयत्न असेल. हा स्टार खेळाडू आहे, दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्यूप्लेसिस. मागच्या काही वर्षांपासून फाफ ड्यूप्लेसिस CSK साठी महत्त्वाची खेळाडू राहिला आहे. 2021 मध्ये CSK ने IPL चे जेतेपद पटकावलं, त्यात फाफ ड्यूप्लेसिसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मागच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता.

मागच्यावेळी फक्त 1.5 कोटीमध्ये विकत घेतलं भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या मते ड्यूप्लेसिस सारख्या खेळाडूला आपल्या चमूत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसू शकते. स्वत: अश्विनही मेगा ऑक्शनमध्ये आहे. “मागच्यावेळी सीएसकेने फाफ ड्यूप्लेसिस फक्त 1.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण आता तसंच होईल, असं वाटत नाही. सीएसकेच्या चाहत्यांना नक्कीच तो आपल्या संघात हवा असेल. यावेळी सीएसकेला ड्यूप्लेसिसला विकत घ्यायचे असेल, तर त्यांना मागच्यावेळपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. माझ्या मते फाफ ड्यूप्लेसिस सारख्या खेळाडूला संघात घेण्यासाठी मोठी चुरस दिसेल” असे अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटलं आहे.

मेगा ऑक्शनआधी सीएसकेने रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मोइन अली आणि ऋतुराज गायकवाड या चौघांना रिटेन केलं आहे. आयपीएलमध्ये सीएसकेने आतापर्यंत चार जेतेपद पटाकवली आहे.

संबंधित बातम्या: IND vs WI: ऋषभ पंतला ओपनिंगला का आणलं? दुसरी संधी मिळेल का? रोहित शर्माने दिलं उत्तर IND vs WI: ‘ऐक, आम्हाला तुझ्याकडून…’ पंतला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगावर गावस्कर म्हणतात…. IND vs WI: …आणि मैदानातच केएल राहुल सूर्यकुमारवर झाला नाराज, पाहा VIDEO

‘Last time, they stole him for 1.5 crore’ Ashwin warns CSK to ‘be ready to spend lot more for star in IPL mega auction

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.