Shikhar Dhawan : ‘आता बस कर अजून किती खेळणार?’, शिखर धवन याने दिला दिग्गज खेळाडूला थेट सल्ला
Shikhar Dhawan : शिखर धवन सध्या टीम इंडियात नाही. असं असलं तरी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आता शिखर धवनच्या एक कमेंट चांगलीच चर्चेत आहे. दिग्गज खेळाडूला थेट आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई : भारतीय संघात स्थान मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं खूपच कठीण आहे. सध्या असं काहीसं शिखर धवनच्या बाबतीत झालं आहे. शिखर धवन टीम इंडियात नाही. पण सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. व्हिडीओ, फोटो किंवा चाहत्यांशी थेट संवाद साधत असतो. आता शिखर धवन याने दिग्गज क्रिकेटपटूला न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या या कमेंटमुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. हा दिग्गज क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून चेतेश्वर पुजारा आहे. चेतेश्वर पुजार टीम इंडियासाठी फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत शेवटचा खेळला होता. त्यानंतर टेस्ट संघात स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे संघात स्थान न मिळाल्याने 35 वर्षीय पुजारा देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. नुकतंच इराणी ट्रॉफी 2023-24 सीझन खेळण्याची घोषणा केली आहे. यावर शिखर धवन याने कमेंट केली आहे.
चेतेश्वर पुजारा याने सरावाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याखाली कमेंट लिहिली आहे. इराणी ट्रॉफीसाठी कसून सराव करत आहे, असं लिहिलं आहे. व्हिडीओ आणि त्या खालील कमेंट पाहिल्यानंतर शिखर धवन याने थेट सल्ला दिला आहे. “भावा आता बस कर आता यंगस्टर्सना पण खेळू दे. इराणी आता तुझ्यासाठी नानी ट्रॉफी झाली आहे.”, असं शिखर धवन याने लिहिलं आहे. तसेच हसणारी इमोजी टाकली आहे.

चेतेश्वर पुजारा याने शेवटचा कसोटी सामना द ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध यावर्षी जूनमध्ये खेळला होता. पण या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. चेतेश्वर पुजारा याने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत. यात 19 शतकांसह 7195 धावा केल्या आहेत. तर नाबाद 206 ही सर्वोत्तम खेळी आहे.
इराणी ट्रॉफी 2023-24 ची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून होईल. 5 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा असेल. रणजी ट्रॉफी 2023-204 विन टीम सौराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडिया क्रिकेट टीम यांच्यात हा सामना होणार आहे. इराणी ट्रॉफीचं हे 16 वं पर्व आह.
