AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : संजीव गोयंकांसह चर्चेनंतर केएलला नेतृत्व सोडावं लागणार? कोचने म्हटलं…

Sanjiv Goenka KL Rahul Controversy : लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायजीचे मालक संजीव गोयंका आणि कॅप्टन केएल राहुल या दोघांमध्ये झालेल्या चर्चेबाबत सर्वात मोठा खुलासा झाला आहे.

IPL 2024 : संजीव गोयंकांसह चर्चेनंतर केएलला नेतृत्व सोडावं लागणार? कोचने म्हटलं...
K L RAHUL LSGImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 13, 2024 | 9:43 PM
Share

केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्सला 8 मे रोजी सनरायजर्स हैदराबादकडून 10 विकेट्सने लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल या दोघांमध्ये झालेली चर्चा सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरलाय. संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. हैदराबादकडून 10 विकेट्सने झालेल्या पराभवामुळे गोयंका संतप्त झाल्याचं व्हीडिओ पाहिल्यानंतर वाटतं. इतकंच काय, तर केएल राहुलऐवजी कॅप्टन म्हणून दुसऱ्या खेळाडूचा विचार केला जात असल्याचंही म्हटलं जात आहे. याबाबत लखनऊकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या सर्व प्रकारानंतर लखनऊचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुसनर यांनी सर्व काही सांगून टाकलंय.

लखनऊ सुपर जायंट्स 8 मे नंतर आपला पुढील सामना हा 14 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध होणार आहे. या सामन्याआधी सोमवारी पत्रकार परिषदेत क्लुसनर यांनी सर्व काही स्पष्ट केलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, “2 क्रिकेट चाहत्यांमध्ये झालेल्या चर्चेत काहीच समस्या दिसून येत नाही. आमच्यासाठी हा प्रकार म्हणजे राईचा पर्वत केल्यासारखा आहे. ही काही मोठी गोष्ट नाही”, असं क्लुसनर म्हणाले.

तो व्हायरल व्हीडिओ

कॅप्टन बदलणार का?

केएल राहुलला कॅप्टन्सी सोडावी लागणार का? या चर्चेवरही क्लूसनर यांनी प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम लावला. तसेच लखनऊची कामगिरी अपेक्षेनुसार कामगिरी करता न आल्याचंही क्लूसनर यांनी मान्य केलं. मात्र यानंतरही क्लूजनर यांना बदलाची अपेक्षा आहे. “आरसीबीने जे केलंय, तेच आम्हाला करावं लागेल. टीमसाठी हे शक्य आहे. कॅप्टन म्हणून केएलसाठी हा हंगाम अवघड राहिला. आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही, जितकी अपेक्षित होती”, असंही क्लूसनर यांनी मान्य केलं.

लान्स क्लूसनर काय म्हणाले?

दरम्यान लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. लखनऊची या हंगामात आतापर्यंतची कामगिरी ही 50-50 अशी राहिली आहे. लखनऊने 6 सामने जिंकलेत आणि तितकेच गमावलेत. लखनऊच्या खात्यात 12 पॉइंट्स आहेत आणि नेट रनरेट हा -0.769 असा आहे. लखनऊला प्लेऑफच्या आशा कायम राखाच्या असतील तर त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्यानंतरही लखनऊचं समीकरण हे दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्यामुळे चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.