AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs RR Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी राजस्थानला 200 पार पोहचवणार?

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Toss and Playing 11 : होम टीम लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. दोघांसमोर सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीनंतर कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे.

LSG vs RR Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी राजस्थानला 200 पार पोहचवणार?
LSG vs RR TossImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 22, 2026 | 7:54 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 32 व्या सामन्यात आज 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनसेामने आहेत. राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघांचा हा प्रत्येकी सातवा सामना आहे. ऋषभ पंत याच्याकडे लखनौ सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. या 2 युवा कर्णधारांमध्ये चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे. उभयसंघातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनौच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन पंतने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण?

राजस्थानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला लखनौ सुपर जायंट्स 2 बदलांसह मैदानात उतरणार आहे. मनीमरण सिंग याच्या जागी दिग्वेश राठी याचा समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज आवेश खान याच्या जागी प्लेइंग ईलेव्हन मयंक यादव याला संधी देण्यात आली आहे. मयंकचा हा या मोसमातील पहिलाच सामना असणार आहे.

लखनौमधील आकडेवारी

दरम्यान लखनौतील एकाना स्टेडियममध्ये हा सामना आयोजित करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेत 2025 पासून या मैदानात एकूण 2 वेळा पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर 8 वेळा चेजिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या ही 185 इतकी आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थानला या मोसमात अप्रतिम सुरुवात मिळवून दिली आहे. त्यामुळे ही सलामी जोडी लखनौ विरुद्ध राजस्थानला कशी सुरुवात मिळवून देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कॅप्टन), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, ब्रिजेश शर्मा आणि नांद्रे बर्गर.

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, एडन मार्कराम, मुकुल चौधरी, मोहम्मद शमी, मोहसीन खान, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी आणि मयंक यादव.

Follow Us
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू