AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विश्वचषकापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला धक्का, बाऊचर देणार राजीनामा

बाऊचरनं त्याच्या काही वैयक्तिक एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाचं सन्मान केल्याचंही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे. यावेळी भविष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.

विश्वचषकापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला धक्का, बाऊचर देणार राजीनामा
Mark BoucherImage Credit source: social
| Updated on: Sep 12, 2022 | 10:51 PM
Share

नवी दिल्ली : टी-20 (T20) विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला  मोठा धक्का बसला आहे. संघाचे हेड मार्क बाऊचर यानं राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला हा मोठा धक्का मानला जातोय. क्रिकेट साऊथ आफ्रिकेनं (CSA) आज जाहीर केलं की, मुख्य कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर आपलं पद सोडून देतील. बोर्डाने यावेळी सांगितलं की, बाऊचरनं त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे या निर्णय घेतला आहे. तर त्याचवेळी बोर्डानं त्यांच्या निर्णयाचं सन्मान केल्याचही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे. यावेळी भविष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.

हे ट्विट वाचा….

बाऊचरविषयी अधिक वाचा….

बाऊचरनं डिसेंबर 2019मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाची धुरा सांभाळली होती. बाऊचरच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघानं दहा टेस्ट मॅचमध्ये यश मिळवलं होतं. ज्यामध्ये या वर्षीच्या जानेवारीत झालेल्या भारताविरुद्ध 2-1 नं टेस्ट सीरीजचा देखील समावेश आहे. दक्षिण आफ्रिका यावेळी आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशिपमध्ये दूसऱ्या क्रमांकावर आहे. मर्यादीत ओव्हरच्या सामन्यात देखील बाऊचर हा कोच असताना संघानं आतापर्यंत बारा वनडे आणि 23 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत.

एकीकडे टीम इंडियानं संघाची घोषणा केली आहे.तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय. 28 सप्टेंबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत तीन सामन्याची टी 20 सीरिज खेळायची आहे. इतक्या सामन्याची कसोटीही खेळायची आहे. हे तर आहेच. शिवाय विश्वचषकही असणार आहे. त्यामुळे बाऊचरच्या निर्णयाचा मोठा धक्का मानला जातोय.

आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार संघ पुढीलप्रमाणे आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

भारताविरुद्धच्या T20  मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रुसो, ट्रिस्टन शाम्सी, ट्रिब्स, सेंट.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.