Cricket : मॅथ्यू हेडनचा घातक, एकापेक्षा एक हुकमी खेळाडू असलेला संघ, ना विराट ना रोहित तरीपण टीम एकदम कडक!
मॅथ्यू हेडनच्या या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा धोकादायक खेळाडूंचा समावेश आहे जे एकट्याच्या दमावर संपूर्ण सामने पालटवण्याची ताकद ठेवतात.

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज आणि स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडनने जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी निवड करून त्याची सर्वोत्तम IPL प्लेइंग इलेव्हन (प्लेइंग 11) बनवली आहे. मॅथ्यू हेडनने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून एका भारतीय क्रिकेटपटूची निवड केली आहे. मॅथ्यू हेडनच्या या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा धोकादायक खेळाडूंचा समावेश आहे जे एकट्याच्या दमावर संपूर्ण सामने पालटवण्याची ताकद ठेवतात.
मॅथ्यू हेडनने शुबमन गिलला त्याच्या सर्वोत्कृष्ट IPL प्लेइंग इलेव्हनमध्ये (प्लेइंग 11) सलामीवीर म्हणून स्थान दिलं आहे. हेडनने शुबमन गिलचा सलामीला जोडीदार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी फाफ डू प्लेसिस आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव यांना स्थान दिलं आहे.
हेडनने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी घेतलं आहे. तर प्लेइंग इलेव्हनमध्ये सहाव्या क्रमांकाच्या आणि अष्टपैलू खेळाडूच्या जागेसाठी रवींद्र जडेजाची निवड केली आहे. त्यानंतर या संघामध्ये सातव्या क्रमांकावर कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे संघाच्या कर्णधारपदाची आणि कीपिंगची जबाबदारी दिली आहे.
संघामधील गोलंदाजी विभागाची जबाबदारी मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांच्याकडे असणार आहे. तर फिरकी गोलंदाजी ही करामत खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशिद खान आणि नूर अहमदकडे दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे या संघात ना विराट कोहल ना रोहित शर्मा यांना स्थान दिलं नाही.
मॅथ्यू हेडनने निवडलेला जगातील सर्वोत्तम खेळ 11:
शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा.
