AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आता थांबवून दाखवाच! मुंबई टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?

Mumbai Indians Will Jacks IPL 2026 : मुंबई इंडियन्स सलगच्या पराभवानंतर विजयी ट्रॅकवर परतली आहे. अशात आता मुंबई टीमसह मॅचविनर ऑलराउंडर जोडला गेला आहे. त्यामुळे पलटणला बूस्टर मिळाला आहे. जाणून घ्या तो कोण आहे.

IPL 2026 : आता थांबवून दाखवाच! मुंबई टीममध्ये मॅचविनर खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?
Hardik Bumrah Surya Mumbai Indians IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 22, 2026 | 3:51 AM
Share

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. मात्र त्यानंतर मुंबईला सलग 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे मुंबईवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र मुंबईने सोमवारी 20 एप्रिलला गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने अहमदाबादमध्ये गुजरातला पराभूत करत सामना जिंकला. मुंबईचा गुजरात विरुद्धचा अहमदाबादमधील पहिला तर एकूण दुसरा विजय ठरला. आता मुंबई आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी मुंबईची ताकद वाढली आहे.

ऑलराउंडर विल जॅक्स आला रे!

चेन्नई विरूद्धच्या सामन्याला काही तास बाकी असताना मुंबईच्या गोटात मॅचविनर खेळाडूची एन्ट्री झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विल जॅक्स मुंबईसह जोडला गेला आहे. त्यामुळे मुंबईची बाजू आणखी भक्कम झाली आहे. मात्र विल मुंबई टीममध्ये सामील झाल्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. क्रिकबझनुसार, विलने वानखेडे स्टेडियममध्ये मुंबईच्या खेळाडूंसह सराव केला. त्यामुळे विलला चेन्नई विरुद्ध संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विल ऑलराउंडर आहे. तो बॅटिंगसह बॉलिंग करण्यात माहीर आहे. तसेच तो ओपनिंगही करतो. त्यामुळे विलला रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत मुंबईकडून ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. गुजरात विरूद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक याच्यासोबत डेब्युटंट दानिश मालेवार याने ओपनिंग केली होती. मात्र दानिश अपयशी ठरला होता. त्यामुळे विलला संधी मिळाल्यास तो ओपनिंगला खेळताना दिसू शकतो.

विलची टी 20i वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी

दरम्यान विलने भारतात झालेल्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. विलने 8 सामन्यांत इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. विलने या 8 सामन्यांमध्ये 226 धावा केल्या. तसेच विलने एकूण 9 विकेट्सही मिळवल्या होत्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सला टी 20i वर्ल्ड कप प्रमाणे आयपीएलमध्येही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.

आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्स टीम : नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रायन रिकेल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), राज बावा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, मिचेल सँटनर, तिलक वर्मा,ट्रेन्ट बोल्ट, अश्वनी कुमार, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, मयंक मार्कंडे, अल्लाह गझनफर, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, रॉबिन मिन्झ, रघु शर्मा, मोहम्मद सलाहुद्दीन इझार, दानिश मालेवार आणि मयंक रावत.

Follow Us
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी