AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs CSk Prediction Playing XI IPL 2022: चेन्नईच्या ताफ्यात मराठमोळ्या गोलंदाजाला संधी, मुंबईच्या पलटनमध्ये परदेशी खेळाडूची एंट्री

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians and Chennai Super Kings) या दोन संघांसाठी आयपीएल (IPL-2022) ही स्पर्धा अत्यंत वाईट ठरली आहे. या दोन संघांची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये केली जाते.

MI vs CSk Prediction Playing XI IPL 2022: चेन्नईच्या ताफ्यात मराठमोळ्या गोलंदाजाला संधी, मुंबईच्या पलटनमध्ये परदेशी खेळाडूची एंट्री
MI vs CSk Prediction Playing XI IPL 2022Image Credit source: IPL
| Updated on: Apr 20, 2022 | 6:35 PM
Share

MI vs CSk Playing XI : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Mumbai Indians and Chennai Super Kings) या दोन संघांसाठी आयपीएल (IPL-2022) ही स्पर्धा अत्यंत वाईट ठरली आहे. या दोन संघांची गणना आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये केली जाते. आयपीएलचे जेतेपद पाचवेळा जिंकण्यात मुंबईला यश आलं आहे, तर चेन्नईच्या संघाने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र, या मोसमात हे दोन्ही संघ एका विजयासाठी तरसले आहेत. सहा सामने खेळूनही मुंबईला विजयाचे खाते उघडता आले नाही, तर चेन्नईने सहापैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. आता हे दोन्ही संघ गुरुवारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत.

गोलंदाजी दोन्ही संघांसाठी चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराहला साथ देऊ शकेल असा एकही गोलंदाज मुंबईच्या संघात नाही. त्याचबरोबर चेन्नईची गोलंदाजीही कमकुवत दिसत आहे. मुंबईसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे रोहित शर्माचा खराब फॉर्म. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलेलं नाही. अशा स्थितीत पुढील सामन्यात या दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता आहे.

‘या’ परदेशी खेळाडूला मुंबई संधी देणार

मुंबईची गोलंदाजी कमकुवत आहे. टायमल मिल्स किंवा डॅनियल सॅम्स दोघेही बुमराहला साथ देऊ शकले नाहीत. जयदेव उनाडकट आणि बेसिल थंपी यांनीही निराशा केली आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा रायली मेरेडिथला संधी देऊ शकतो. मुंबईने त्याला यंदा एक कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मात्र अद्याप त्याला एकाही सामन्यात संधी दिलेली नाही. अशा स्थितीत त्याला पुढील सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, मुरुगन अश्विनला त्याच्या फिरकीने छाप पाडता आलेली नाही. त्याचा पर्याय म्हणून संघात मयंक मार्कंडे आहे जो चार वर्षांपूर्वीही या संघासोबत होता. संघ आपल्या जुन्या सहकाऱ्याला संधी देऊ शकतो.

चेन्नईच्या संघातून परदेशी खेळाडूला डच्चू

लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ विजयी होईल असे वाटत होते पण ख्रिस जॉर्डनच्या एका महागड्या षटकाने खेळ पलटला. अशा स्थितीत रवींद्र जडेजा जॉर्डन ऐवडी दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसला संधी देऊ शकतो. त्याने या मोसमात दोन सामने खेळले असून चार विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. त्याने आपल्या डेथ बॉलिंगने खूप प्रभावित केले आहे. त्याचबरोबर मुकेश चौधरीला सतत संधी मिळत असली तरी तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. अशा परिस्थितीत अंडर-19 संघातील स्टार खेळाडू राजवर्धन हेंगरगेकरला संधी मिळू शकते.

दोन्ही संघांची संभाव्या प्लेईंग-11

  1. चेन्नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी / राजवर्धन हेंगरगेकर, महिश तीक्ष्णा.
  2. मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स/रायली मेरीडिथ.

इतर बातम्या

IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

LSG vs RCB IPL 2022: रवीना टंडनच्या अदांनी केलं घायाळ, KGF 2 ची टीम डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.