AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्स टीमचा धमाका, पहिलाच सामना जिंकत वर्ल्ड रेकॉर्ड

मुंबईच्या 'पलटण'नने गुजरातवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने गुजरातचा तब्बल 143 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्स टीमचा धमाका, पहिलाच सामना जिंकत वर्ल्ड रेकॉर्ड
| Updated on: Mar 05, 2023 | 3:30 PM
Share

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्या पर्वाला शनिवार 4 मार्चपासून सुरुवात झाली. पहिल्यावहिल्या मोसमातील सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईच्या ‘पलटण’नने गुजरातवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने गुजरातचा तब्बल 143 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने या विजयासह वर्ल्ड रेकॉर्ड केला.

मुंबईने गुजरातवर तब्बल 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. साधारणपणे इतक्या धावांचं टी 20 क्रिकेटमध्ये आव्हान दिलं जातं. मात्र मुंबईने इतक्या धावांनी सामना जिंकला. मुंबईने या कामगिरीसह मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. याआधी हा वर्ल्ड रेकॉर्ड वूमन्स बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सच्या नावावर होता.

पर्थ स्कॉचर्सने 2022 मध्ये मेलबर्न रेनेगेड्सवर 104 धावांनी विजय मिळवला होता. याआधी 100 पेक्षा जास्त धावांच्या फरकाने फक्त 2 संघांनाच विजय मिळवता आला आहे.

दुसरी सर्वोच्च धावसंख्या

मुंबईने या सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. वूमन्स टी 20 क्रिकेट लीगच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली. याआधी 2017 मध्ये सिडनी सिक्सर्सने मेलबर्न स्टार्स विरुद्ध 4 विकेट्स गमावून 242 धावा केल्या होत्या.

सामन्याचा धावता आढावा

गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. मुंबईने धुव्वाधार बॅटिंग करत 207 धावा केल्या. यामुळे गुजरातला विजयासाठी 208 धावांचं आव्हान मिळालं.

गुजरात विजयी धावांचं पाठलाग करायला मैदानात आली. मात्र मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर एकालाही मैदानात तग धरता आला नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 15.1 ओव्हरमध्ये 64 धावांवर गुंडाळलं.

गुजरातकडून दयालन हेमलथा हीने सर्वाधिक नाबाद 29 धावा केल्या. तर मोनिका पटेलने 10 रन्स केल्या. गुजरातच्या 4 जणींना भोपळाही फोडता आला नाही. या शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.

सब्बीनेनी मेघना ही 2 धावा करुन तंबूत परतली. मानसी जोशी आणि अनाबेल सुथरलँड या दोघींनी 6 धावा केल्या. जॉर्जिया वारेहम ही 8 धावा करुन आऊट झाली. स्नेह राणाने फक्त 1 धावा केली. तर मुंबईकडून सायका इशाक हीने 4 विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्स महिला संघ | हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता आणि सायका इशाक.

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी आणि मोनिका पटेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.