वंशभेदी टीकेमुळे नोकरी गेली, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मागितली माफी, म्हणाला, ‘मी काही चुका केल्या’

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या वादात अडकला आहे. वॉनवर वांशिक टीका केल्याचे अनेक आरोप झाले होते. त्यानंतर आता त्याला शिक्षा झाली आहे.

वंशभेदी टीकेमुळे नोकरी गेली, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने मागितली माफी, म्हणाला, 'मी काही चुका केल्या'
Michael Vaughan - Azeem Rafiq

नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन गेल्या काही दिवसांपासून एका मोठ्या वादात अडकला आहे. वॉनवर वांशिक टीका केल्याचे अनेक आरोप झाले होते. त्यानंतर आता त्याला शिक्षा झाली आहे. बीबीसीने त्याला अॅशेस कव्हरेजमधून काढून टाकले आहे. यानंतर वॉनने निराशा व्यक्त करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Michael Vaughan apologises to Azeem Rafiq for ‘hurt’ during racism controversy)

वॉनला मोठी शिक्षा

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने काही वर्षांपूर्वी आशियाई वंशाच्या खेळाडूवर वंशभेदी टीका केल्याबद्दल बीबीसीने त्याला अॅशेस कव्हरेजमधून हटवलं आहे. आपली निराशा व्यक्त करताना, वॉन म्हणाला की, त्याला क्रिकेटला “सर्वांसाठी अधिक स्वागतार्ह खेळ” बनवण्यास मदत करायची आहे. अॅशेस जिंकणारा इंग्लंडचा कर्णधार वॉन ऑस्ट्रेलियातील आगामी मालिकेचा भाग नसल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

वंशभेदी किंवा वर्णद्वेषी टीका केली नसल्याचा पुनरुच्चार

इंग्लंडचा माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू अझीम रफिक याच्यासोबतच्या वांशिक अत्याचाराच्या घटना उघड झाल्यापासून इंग्लिश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध यॉर्कशायर काउंटीकडून खेळलेल्या अझीम रफिकने क्लबमधील सहकारी खेळाडूंनी त्याच्यावर वंशभेदी कमेंट्स केल्याच्या प्रकरणांचा पर्दाफाश केला, त्यानंतर यॉर्कशायर क्लबचे अधिकारी आणि संघातून खेळणारे काही इंग्लिश क्रिकेटपटू अडचणीत आले. मायकेल वॉन हा त्यांच्यापैकीच एक आहे, जो यॉर्कशायरशी बराच काळ संबंधित होता आणि त्याच्यावरदेखील वंशभेदी टीका केल्याचा आरोप होता. ज्यामुळे त्याला बीबीसीशी समालोचनाचा करार गमवावा लागला होता. आता या प्रकरणी वॉनने माफी मागितली आहे. मात्र, आपण कोणतीही वंशभेदी किंवा वर्णद्वेषी टीका केली नसल्याचा पुनरुच्चार वॉनने केला.

यॉर्कशायरच्या अधिकाऱ्यांचा राजीनामा

अझीम रफिकने गेल्या वर्षी क्लबवर आरोप केले होते, त्यानंतर क्लबने तपास सुरू केला, परंतु अधिकाऱ्यांवर अहवाल लपवल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच अझीम रफिक याची प्रतिमा डागाळण्याचेही प्रयत्न झाले. मात्र इंग्रजी माध्यमांमध्ये नुकत्याच झालेल्या खुलाशांमध्ये अनेक अधिकारी आणि क्रिकेटपटूंची नावे समोर आली आहेत. त्यानंतर यॉर्कशायरच्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, तर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही काही खेळाडूंवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर ब्रिटिश संसदेची एक समितीही या प्रकरणाची चौकशी करत आहे.

अझीम रफिकची माफी

रफिकच्या आरोपांनंतर मायकल वॉनदेखील वंशभेदी टीकेप्रकरणी चर्चेत आहे, ज्यामुळे बीबीसीने वॉनला आपल्या एका कार्यक्रमातून काढून टाकले आहे. 2009 मध्ये नॉटिंघमशायरविरुद्धच्या सामन्यादरम्यान वॉनने क्लबमध्ये उपस्थित असलेल्या आशियाई खेळाडूंच्या गटाला संबोधले की, “तुमची संख्या खूप वाढली आहे, यासाठी काहीतरी केले पाहिजे.”

आता या प्रकरणी वॉनने आपले स्पष्टीकरण दिले आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, वॉनने वंशभेदी टीकेबाबतचे आरोप नाकारले, परंतु रफिकची माफी मागितली. तो म्हणाला, “नाही, मी तसे केले नाही. जर त्याला (अजीम रफिक) अशा एखाद्या कृतीमुळे दुःख झाले असेल तर मी त्याच्यासाठी दिलगीर आहे.

इतर बातम्या

Gautam gambhir : भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी, ISIS चे खबरी दिल्ली पोलिसांत?

IND vs NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने विकेटकीपर बदलला, ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त, भारत अडचणीत

IND vs NZ : भर मैदानात अश्विन आणि पंचांमध्ये वाद, कोच राहुल द्रविड थेट मॅच रेफरींच्या केबिनमध्ये

(Michael Vaughan apologises to Azeem Rafiq for ‘hurt’ during racism controversy)

Published On - 12:05 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI