AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

13 षटकार-3 चौकार, Finn Allen याचं सर्वात वेगवान शतक, रोहित शर्माचा रेकॉर्डही ब्रेक

Fin Allen Records : न्यूझीलंडचा विस्फोटक फलंदाज फिन एलन याने वादळी खेळी करत एका झटक्यात 4 खेळाडूंना मागे टाकलंय. फिनने एमएलसी 2025 मध्ये 151 धावांच्या खेळीसह अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.

13 षटकार-3 चौकार, Finn Allen याचं सर्वात वेगवान शतक, रोहित शर्माचा रेकॉर्डही ब्रेक
Fin Allen Record break Inning Mlc 2025Image Credit source: MLC
Updated on: Jun 13, 2025 | 11:20 AM
Share

आयपीएल 2025 नंतर मेजर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेला एकदम जोरात आणि दणक्यात सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या फिन एलेन याने या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इतिहास घडवला आहे. फिन एलेन याने या स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक झळकावत धमाका केलाय. फिनने अवघ्या 34 चेंडूत झंझावाती अर्धशतक ठोकलं. फिनने यासह या शतकी खेळीत 13 षटकार आणि 3 चौकार लगावले. फिनने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत एकूण 90 रन्स केल्या. फिनने यासह टी 20 लीग क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा यांना पछाडलं. वैभव आणि रोहित या दोघांच्या नावावर 35 चेंडूत शतक करण्याचा विक्रम आहे. तसेच फिनने ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांचाही रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.

फिन एलेनची वादळी खेळी

एमएलसी स्पर्धेतील या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न टीमने वॉशिंग्टन फ्रीडमचा 123 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. फिन एलेन याने केलेल्या 151 धावांच्या जोरावर सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न टीमने वॉशिंग्टन फ्रीडमसमोर 270 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वॉशिंग्टन फ्रीडमला 13.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 146 रन्सच करता आल्या. फिन एलेन सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नच्या विजयाचा शिल्पकार ठरला. एलेन याने फक्त 51 बॉलमध्ये 296.08 च्या स्ट्राईक रेटने 151 रन्स केल्या. एलेनने या खेळीत 19 षटकार आणि 5 चौकार लगावले. फिनने या खेळीसह नक्की कोणत रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले? जाणून घेऊयात.

निकोलस पूरनचा रेकॉर्ड ब्रेक

फिनने 34 चेंडूत शतक पूर्ण केलं. फिनने यासह वैभव सूर्यवंशी आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकलं. वैभव आणि रोहित या दोघांनी 35 चेंडूत शतक झळकावलं होतं. तसेच फिनने या स्पर्धेत निकोलस पूरन याच्या नावावर असलेला सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला. निकोलस पूरन याने 2023 साली 40 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. निकोलस पूरन एमएलसी स्पर्धेत यंदा मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कचं नेतृत्व करणार आहे.

फिन एलेनची तोडफोड खेळी,  पूरनचा विक्रम उद्धवस्त

ख्रिस गेलचा रेकॉर्ड ब्रेक

एलेनने 19 षटकारांसह ख्रिस गेल यालाही मागे टाकलं. एलेनने गेलचा एका टी 20 सामन्यात सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. ख्रिस गेल याने 17 सिक्स लगावले होते. गेलने आयपीएलमध्ये ही कामगिरी केली होती.

राजीनामा दिलाच नाही... भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटलांचं भाष्य
राजीनामा दिलाच नाही... भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटलांचं भाष्य.
गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले...
गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले....
कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर... विरोधकांना राणेंचं चॅलेंज काय?
कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर... विरोधकांना राणेंचं चॅलेंज काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम? राज ठाकरे स्पष्टच म्हणाले...
ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम? राज ठाकरे स्पष्टच म्हणाले....
Saamana : बहिणींची 'लाडकी' योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी 'दोडकी'
Saamana : बहिणींची 'लाडकी' योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी 'दोडकी'.
येमेनमध्ये भारतीय नर्सच्या निमिषा प्रियाला होणार फाशी, उरला एकच दिवस
येमेनमध्ये भारतीय नर्सच्या निमिषा प्रियाला होणार फाशी, उरला एकच दिवस.
वैष्णवी हुंडाबळी प्रकरण : तब्बल 1,676 पानांचं दोषारोपपत्र, उल्लेख काय?
वैष्णवी हुंडाबळी प्रकरण : तब्बल 1,676 पानांचं दोषारोपपत्र, उल्लेख काय?.
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.