मोहम्मद आमीरचा क्रिकेटला रामराम, पाक क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप

आमीरने 2009 मध्ये वयाच्या 17 वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:44 PM, 17 Dec 2020
मोहम्मद आमीरचा क्रिकेटला रामराम, पाक क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohammad Amir) आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायासह त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीवर (PCB) गंभीर आरोप केले आहेत. आमीरने पीसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पीसीबीने मानसिक छळ केल्याचा आरोप पीसीबीवर लगावला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी आमिरची निवड करण्यात आली नाही. mohammad amir announces retirement from cricket and said he cannot work with PCB
management

आमीर काय म्हणाला?

पाकिस्तानचे पत्रकार शोएब जट यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. “मी क्रिकेटपासून दूर जात नाहीये. आता असलेली परिस्थिती सर्वांना माहिती आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी 35 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये माझी निवड केली नाही. 35 जणांमध्ये निवड होत नाही, यावरुन माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं सिद्ध होतं. या क्रिकेट बोर्डासह आणखी क्रिकेट खेळता येईल, असं वाटत नाही. क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आली आहे”, असं आमीर या व्हिडीओत म्हणाला.

“मला वाटत नाही की आता मी कोणत्याही प्रकारचा छळ सहन करू शकतो. मी 2010 ते 2015 या दरम्यान अत्याचारांचा साक्षीदार आहे. मी काही काळ क्रिकेटपासून दूर होतो. मी माझ्या चुकीबद्दल मी दंड भरला. पीसीबीने माझ्यामध्ये खूप गुंतवणूक केली आहे, असं म्हणत माझ्यावर वारंवार मानसिक छळ केला जात आहे”, असा पुनरोच्चार आमीरने केला.

नजम सेठी आणि शाहिद आफ्रदीची साथ

मी पाच वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर पुनगरागमन केलं. या माझ्या पडत्या काळात सहकारी शाहिद आफ्रिदी आणि नजम सेठीने मला साथ दिली. मात्र इतर सहकाऱ्यांनी मला साथ दिली नाही. आम्ही आमीरसह खेळणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती, अशी खंत आमीरने व्यक्त केली.

वयाच्या 17 वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण

मोहम्मद आमिरने वयाच्या 17 व्या वर्षी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. आमीरने त्याच्या स्विंगने छाप पाडली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत तो स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात तो सापडला. या फिक्सिंगमुळे आमीरवर 2010 मध्ये 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. जुलै 2016 मध्ये त्याने पुनरागमन केलं. पाकिस्तानने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या चॅम्पियन ट्रॉफीचं विजेतेपद मिळवून देण्यात आमीरने मोलाची भूमिका बजावली. त्याने टीम इंडियाविरोधातील अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी केली. आमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी, 61 एकदिवसीय आणि 50 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 250 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान याआधी जून 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती.

संबंधित बातम्या :

NZ vs PAK: न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिकेआधी पाकिस्तानला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे सीरिजबाहेर

mohammad amir announces retirement from cricket and said he cannot work with PCB
management