AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK: न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिकेआधी पाकिस्तानला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे सीरिजबाहेर

पाकिस्तान न्यूझीलंडविरोधात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे.

NZ vs PAK: न्यूझीलंडविरोधातील टी 20 मालिकेआधी पाकिस्तानला धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे सीरिजबाहेर
| Updated on: Dec 13, 2020 | 1:30 PM
Share

वेलिंग्टन : पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. या टी 20 मालिकेला 18 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेआधी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) दुखापत झाली आहे. त्यामुळे आझमला टी 20 मालिकेला मुकावे लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. बाबर टी 20 मालिकेतून बाहेर पडल्याने पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे. Pakistan captain Babar Azam ruled out due to injury against new zealand t 20 series

रविवारी नेट्स प्रकॅटीस करण्यात आली. या दरम्यान बाबर आझमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले. या दुखापतीमुळे बाबरला मालिकेला मुकावे लागले आहे. इतकच नाही तर त्याला पुढील 12 दिवस नेट्स प्रकॅटीस करता येणार नाही. बाबरवर वैदयकीय पथक लक्ष देऊन आहे. तसेच बाबरच्या कसोटी मालिकेत खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बाबरला वैदयकीय पथकाच्या परवानगी नंतरच कसोटी मालिकेत खेळता येणार आहे. टी 20 मालिकेनंतर कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. 2 कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे.

बाबरच्या दुखापतीमुळे नव्या खेळाडूंना संधी

“क्रिकेटमध्ये दुखापतीचं सत्र सुरुच असतं. मात्र बाबरला झालेल्या दुखापतीमुळे आम्हाला दु:खं आहे. बाबर दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या युवा खेळाडूला संधी मिळेल”, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा प्रशिक्षक मिस्बाह उल हकने दिली.

इमाम उल हकलाही दुखापत

बाबरच्या आधी इमाम उल हक यालाही दुखापत झाली आहे. इमामला थ्रो डाउन सरावादरम्यान दुखापत झाली. यामध्ये त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे डॉक्टरांनी इमामला 12 दिवस विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. बाबर आणि इमान या दोघांवर वैद्यकीय पथक लक्ष देऊन आहेत.

शादाब खानच्या खेळण्याबाबत अनिश्चितता

पाकिस्तानचा उप कर्णधार शादाब खानच्या खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. शादाबला ग्रोईन इंज्युरी झाली आहे. यामुळे त्याला झिंबाब्वेविरोधातील टी 20 मालिकेलाही मुकावे लागले होते. दरम्यान आता तो पहिल्या टी 20 मालिकेत खेळणार की नाही, हे या सामन्याआधी ठरवण्यात येणार आहे.

टी 20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ

शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फहीम अशरफ, हैदर अली, हरीस रऊफ, हुसेन तलत, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद मुझान खान, मोहम्मद रिझवान , सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान कादिर आणि वहाब रियाज.

पहिल्या टी 20 सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), टॉड एस्ले, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेवन कॉन्वे, जॅकब डफी, मार्टिन गुप्टील, स्कॉट कुगलेजिन, जिम्मी निशाम, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि ब्लेयर टिकनेर.

दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड एस्ले, ट्रेन्ट बोल्ट, डेवन कॉन्वे, मार्टिन गुप्टील, काइल जेमिसन, स्कॉट कुगलेजिन, डार्ली मिशेल, जिम्मी निशम, ग्लेन फिलिप्स, टीम सेइफर्ट (विकेटकीपर), ईश सोढी आणि टीम साउथी.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – 18 डिसेंबर

दुसरा सामना – 20 डिसेंबर

तिसरा सामना – 22 डिसेंबर

संबंधीत बातम्या :

NZ vs PAK: पाकिस्तानविरोधातील टी 20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन

Pakistan captain Babar Azam ruled out due to injury against new zealand t 20 series

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.