AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पाकिस्तानच्या फलंदाजाची दुसऱ्यांदा शिकार, भारतीय गोलंदाजाची कमाल

पाकिस्तानच्या एका फलंदाजाला दुसऱ्यांदा भारतीय गोलंदाजासमोर झुकावं लागलं आहे. असं नेमकं काय झालं, जाणून घ्या...

VIDEO : पाकिस्तानच्या फलंदाजाची दुसऱ्यांदा शिकार, भारतीय गोलंदाजाची कमाल
पाकिस्तानच्या फलंदाजाची दुसऱ्यांदा शिकारImage Credit source: social
| Updated on: Sep 14, 2022 | 7:10 PM
Share

नवी दिल्ली : इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये (County Cricket England)सध्या सॉमरसेट (Somerset) आणि वॉर्कशायर (Warkashayar) यांच्यात सुरु असलेल्या सामन्यातून एका तरबेज गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेटरचं नाव समोर  येतंय. त्यानं यापूर्वी पण पाकिस्तानच्या फलंदाजाला धुळ चारली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचं लक्ष देखील सध्या काउंटी क्रिकेटवर लागून आहे. या सामन्यातून समोर येत असलेले व्हिडीओ भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या एका फलंदाजाला दुसऱ्यांदा भारतीय गोलंदाजासमोर झुकावं लागलं आहे. असं नेमकं काय झालं, का होतेये चर्चा, कोणता आहे तो भारतीय गोलंदाज, याविषयी अधिक जाणून घ्या…

चर्चा तर होणार ना!

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं 5 विकेट्स घेऊन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता तो चर्चेत आहे कारण 24 तासांच्या आत त्याने दुसऱ्यांदा पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हकची शिकार केली आहे. आधी खालचा व्हिडीओ पाहा त्यानंतर नेमकं काय झालं तेही सविस्तर जाणून घ्या.

हा व्हिडीओ पाहा

सिराजचं शानदार पदार्पण

या सामन्यात सॉमरसेटने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांचा पहिला डाव अवघ्या 219 धावांवर आटोपला. पहिल्या डावात एकापाठोपाठ 5 फलंदाज बाद करणाऱ्या सॉमरसेटला 219 धावांवर रोखण्यात मोहम्मद सिराजची सर्वात मोठी भूमिका होती. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 24 षटकात 82 धावा देत 5 बळी घेतले आणि अशा प्रकारे कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

डाव 196 धावांवर आटोपला

सॉमरसेटच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात सिराजच्या संघ वॉरविकशायरची फलंदाजीही विशेष ठरली नाही. या संघाचा पहिला डाव केवळ 196 धावांवर आटोपला. अशाप्रकारे सॉमरसेटला 23 धावांची आघाडी मिळाली.

24 तासांत दुसऱ्यांदा विकेट

सिराजने 24 तासांत दुसऱ्यांदा इमामची विकेट घेतली पण यानंतर जेव्हा सॉमरसेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा पुन्हा एकदा त्याच्या आघाडीच्या दोन फलंदाजांना विकेटवर पाय रोवणे कठीण झाले. याचे कारण पुन्हा एकदा सिराजने 24 तासांत दुसऱ्यांदा सॉमरसेटकडून खेळणाऱ्या इमाम-उल-हक या पाकिस्तानी फलंदाजाची विकेट घेतली. यानंतर मोहम्मद सिराजची चर्चा सुरु झाली.

जयंत यादवही जोमात

मोहम्मद सिराजशिवाय या सामन्यात आणखी एका भारतीय गोलंदाजाची चर्चा झाली आणि ते नाव आहे जयंत यादव. जयंत यादव इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर वेगानं नाही तर फिरकीनं विकेट घेताना दिसला. पहिल्या डावात 1 बळी घेणाऱ्या जयंतने दुसऱ्या डावात पडलेल्या सॉमरसेटच्या 2 विकेटपैकी 1 बळीही घेतला आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.