AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2023 : ईगल नाशिक टायटन्स आणि रत्नागिरी जेट्स संघाचा होणार फैसला, क्वॉलिफायर फेरीचं गणित वाचा

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर आली आहे. सहा संघांमध्ये क्वॉलिफायर फेरीत पोहोचण्यासाठी चुरस आहे. ईगल नाशिक टायटन्स आणि रत्नागिरी जेस्ट यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातून क्वॉलिफायर स्पर्धेचं स्पष्ट होणार आहे.

MPL 2023 : ईगल नाशिक टायटन्स आणि रत्नागिरी जेट्स संघाचा होणार फैसला, क्वॉलिफायर फेरीचं गणित वाचा
MPL 2023 : नाशिक विरुद्ध रत्नागिरी जेट्स सामन्यात संघांचं भवितव्य ठरणार, वाचा गणित
| Updated on: Jun 21, 2023 | 4:55 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स हा संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. साखळी फेरीतील तीन पैकी तीन सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. तर रत्नागिरी जेट्स तीन पैकी दोन सामने जिंकत तिसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघ आमनेसामने असून निकालावर क्वॉलिफायर फेरीचं गणित सुटण्याची शक्यता आहे. क्वॉलिफायर राउंडमध्ये एकूण चार संघांची वर्णी लागणार आहे. गुणतालिकेत टॉप 4 मध्ये असलेल्या संघांना संधी मिळणार आहे. तर तळाशी असलेल्या दोन संघांना गाशा गुंडाळावा लागणार आहे. छत्रपती संभाजी किंग्स आणि सोलापूर रॉयल्स या दोन संघांनी एकही विजय मिळवता आला नाही. तीन पैकी तीनही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

नाशिक आणि रत्नागिरीचं जर तरच गणित

साखळी फेरीत प्रत्येक संघ पाच सामने खेळणार आहे. नाशिक आणि रत्नागिरी या स्पर्धेतील चौथा सामना खेळणार आहे. नाशिकने हा सामना जिंकल्यास टॉप 2 मधील स्थान निश्चित होईल. त्याचबरोबर थेट क्वॉलिफायर राउंडमध्ये वर्णी लागणार आहे. तर रत्नागिरी संघाला संधी असली तरी जर तरचं गणित असणार आहे.

रत्नागिरीने हा सामना जिंकला तर क्वॉलिफायर राउंडमधील स्थान निश्चित होणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि नाशिक संघात टॉप दोनमध्ये राहण्यासाठी चुरस निर्माण होईल. टॉप दोनमध्ये असलेल्या संघांना क्वॉलिफायर राउंडमध्ये दोन संधी मिळतात. महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील विजेत्या संघाला 50 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 25 लाख रुपये मिळणार आहेत.

एमपीएल 2023 स्पर्धेतील पुढील सामने

  • 22 जून 2023 : छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स (दुपारी 2 वाजता)
  • 22 जून 2023 : पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स (संध्याकाळी 8 वाजता)
  • 23 जून 2023 : सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स (संध्याकाळी 8 वाजता)
  • 24 जून 2023 : पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स (दुपारी 2 वाजता)
  • 24 जून 2023 : कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (संध्याकाळी 8 वाजता)
  • 26 जून 2023 : क्वॉलिफायर 1 (संध्याकाळी 8 वाजता)
  • 27 जून 2023 :एलिमिनेटर (संध्याकाळी 8 वाजता)
  • 28 जून 2023 : क्वॉलिफायर 2 (संध्याकाळी 8 वाजता)
  • 29 जून 2023 : अंतिम फेरी (संध्याकाळी 8 वाजता)

संघांचे संपूर्ण स्क्वॉड

ईगल नाशिक टायटन्सचा संपूर्ण स्क्वॉड : राहुल त्रिपाठी (कर्णधार), सिद्धेश वीर, आशय पालकर, धनराज शिंदे, आदित्य राजहंस, आर्शिन कुलकर्णी, इझान सय्यद, रेहान खान, रिशब कारवा, रजेक फल्लाह, ओमकार अखाडे, अक्षय वायकर, प्रशांत सोलंकी, सिद्धांत दोशी, साहिल पारिख, वैभव विभुते, कौशल तांबे, हर्षद खडिवाले, रोहित हडके, वरुण देशपांडे, मंदार भंडारी, शुभम नागावडे, शर्वीन किसवे.

पुणेरी बाप्पाचा संपूर्ण स्क्वॉड : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिद्धये, अझहर अन्सारी, शुभंकर हार्डीकर, वैभव चौगुले, रोशन वाघसरे, पियुश साळवी, आदित्य दावरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जामले, साइश दिघे, सचिन भोसले, अभिमन्यु जाधव, यश क्षीरसागर, पवन शाह, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोथारा, भूषण नवांडे, कुंश दीक्षित, हर्ष ओस्वाल, सुरज शिंदे.

सोलापूर रॉयल्स : विकी ओस्वाल (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, ओंकार राजपूत, हर्षवर्धन टिंगरे, सुनील यादव, यश बोरकर, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग, अंश धूत, प्रतीक म्हात्रे, प्रवीण देशेटी, अथर्व काळे, यश नहार, मेहुल पटेल, यासर शेख, देव डी नाटु, अभिनव भट्ट, स्वप्नील फुलपगार, संकेत फराटे, विशांत मोरे, रुषभ राठोड.

कोल्हापूर टस्कर्स : केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, किर्तीराज वाडेकर, मनोज यादव, विद्या तिवारी, आत्मन पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, सिद्धार्थ म्हात्रे, तारांजित ढिल्लोन, निहाल तुसामद, रवि चौधरी, अंकित बावने, सचिन दास, निखिल मदास, साहिल औताडे.

छत्रपती संभाजी किंग्स : राजवर्धन हंगरगेकर (कर्णधार ), रामेश्वर दौड, आकाश जाधव, मोहसीन सय्यद, जगदीश झोपे, हितेश वाळुंज, रुषिकेश नायर, स्वराज चव्हाण, ओम भोसले, शामसुजामा काझी, आनंद ठेंगे, मुर्तुजा ट्रंकवाला, रणजित निकम, अनिकेत नलावडे, स्वप्नील चव्हाण, स्वप्नील चव्हाण, के. खाटपे, हृषिकेश दौंड, अश्विन भापकर, तनेश जैन, वरुण गुजर, अभिषेक पवार आणि सौरभ नवले.

रत्नागिरी जेट्स : अजीम काझी (कर्णधार), विजय पवळे, दिव्यांग हिंगणेकर, अश्कान काझी, रोहित पाटील, पृथ्वीराज शिळमकर, किरण चोरमले, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, क्रिश शहापूरकर, निकित धुमाळ, प्रदीप दधे, कुणाल थोरात, स्वराज वाबळे, शाहरुख कदीर, एस. तुषार श्रीवास्तव, साहिल चुरी, अकिलेश गवळे, सौरभ शेवाळकर, रुषिकेश सोनवणे, समर्थ कदम आणि निखिल नाईक.

राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?
कुठं कोणाचा सुपडासाफ? कोण कुणाला नडलं? कुठं कोण कुणाशी भिडलं?.
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष
नगरपालिकेतही देवाभाऊंचा करिष्मा, महायुती 200 पार अन् भाजप सर्वात पक्ष.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.