AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPL 2023 PB vs KT | पुणेरी बाप्पाची विजयी सलामी, कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्सने शानदार विजय

Maharashtra Premier League 2023 | ऋतुराज गायकवाड याने महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील पहिल्या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध अर्धशतक ठोकलंय.

MPL 2023 PB vs KT | पुणेरी बाप्पाची विजयी सलामी, कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्सने शानदार विजय
mpl 2023 puneri bappa ruturaj gaikwad
| Updated on: Jun 16, 2023 | 1:21 AM
Share

पुणे | महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिल्या पर्वातील पहिला सामना हा पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स यांच्यात पार पडला. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर करण्यात आलं होतं. या सलामीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पुणेरी बाप्पाने केदार जाधव कॅप्टन असलेल्या कोल्हापूर टस्कर्सवर 8 विकेट्स विजय मिळवला आहे. कोल्हापूर टस्कर्सने पुणेरी बाप्पाला विजयासाठी 145 धावांचं आव्हान दिलेलं. पुणेरी बाप्पाने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पुणेरी बाप्पाकडून ऋतुराज गायकवाड आणि पवन शाह या दोघांनी सर्वाधिक अर्धशतकी खेळी केली.

पुणेरी बाप्पाची विजयी सुरुवात

पुणेरी बाप्पाची बॅटिंग

पुणेरी बाप्पाच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. तब्बल 110 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड आऊट झाला. ऋतुराजने अवघ्या 27 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. या दरम्यान ऋतुराजने एमपीएलमधील वैयक्तिक अर्धशतक हे अवघ्या 22 बॉलमध्ये पूर्ण केलं.  तर पवन शाह याने 48 बॉलमध्ये 57 धावा ठोकल्या. ऋतुराज आणि पवन या दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे पुणेरी बाप्पाचा विजय सोपा झाला. कोल्हापूरकडून तरणजीत ढिल्लो आणि श्रेयस चव्हाण या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

कोल्हापूरची बॅटिंग

त्याआधी पुणेरी बाप्पाने टॉस जिंकला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने कोल्हापूर टस्कर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कोल्हापूरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. कोल्हापूरकडून अकिंत बावने याने सर्वाधिक 57 बॉलमध्ये 72 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाड याला 64 धावांच्या खेळीसाठी मॅन ऑफ द पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऋतुराज एमपीएल स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवणारा पहिलावहिला खेळाडू ठरला.

ऋतुराज गायकवाडची वादळी खेळी

शुक्रवारी डबल हेडरचं आयोजन

दरम्यान शुक्रवारी एमपीएल क्रिकेट स्पर्धेतील पहिल्यावहिल्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा इगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. हे दोन्ही सामने पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील.

पुणेरी बाप्पा प्लेइंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रोहन दामले, वैभव चौघुले, पीयूष साळवी, आदित्य दवारे, शुभम कोठारी, सुरज शिंदे (विकेटकीपर), सचिन भोसले, यश क्षीरसागर, पवन शाह आणि हर्ष संघवी.

कोल्हापूर टस्कर्स प्लेइंग इलेव्हन

केदार जाधव (कॅप्टन आणि विकेटकीपर), नौशाद शेख, कीर्तीराज वाडेकर, मनोज यादव, अक्षय दरेकर, श्रेयस चव्हाण, तरणजीत ढिल्लो, निहाल तुस्माद, अकिंत बावने, सचिन धस आणि साहिल औताडे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.