आधी टीम इंडियाचा मेन्टॉर, आता संरक्षण मंत्रालयाकडून MS Dhoni कडे मोठी जबाबदारी

महेंद्रसिंह धोनीची टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता नॅशनल कॅडेट क्रॉप्स (NCC)ला नवीन स्वरूप देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

आधी टीम इंडियाचा मेन्टॉर, आता संरक्षण मंत्रालयाकडून MS Dhoni कडे मोठी जबाबदारी

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी ऑगस्ट महिना फार महत्त्वाचा ठरला आहे. काही दिवसांपूर्वी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता नॅशनल कॅडेट क्रॉप्स (NCC)ला नवीन स्वरूप देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. (MS Dhoni, Anand mahindra and 13 members defence ministry panel on NCC)

नॅशनल कॅडेट क्रॉप्सला अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. याच समितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश करण्यात आला आहे. धोनी हा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय लष्करासोबत काम करतोय. त्याला लेफ्टनंट कर्नल हे मानद पद देण्यात आलं आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार बैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने 15 सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. यात महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचाही समावेश करण्यात आला आहे.

एम. एस. धोनीची मेन्टॉर म्हणून नियुक्ती

दरम्यान बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंतिम 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यात विराट कोहलीकडे (Virat Kohli) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या संघाचा मेन्टॉर असणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत ही घोषणा झाली आहे.

धोनीच्या संघातल्या कमबॅकने गणितं बदलणार!

धोनीचं टीम इंडियात कमबॅक झाल्याने संघाची गणितं बदलणार आहेत. धोनी संयमी आणि शांत आहे तर याच्याअगदी उलट, विराट खूपच आक्रमक आहे. धोनीच्या शांतपणाचा बहुतेकवेळा भारताला फायदा झालाय. दुसरीकडे विराटच्या आक्रपणामुळे संघाला कधी फायदा तर कधी तोटा होतो. आता धोनीच्या संघातल्या नव्या भूमिकेने काही गणितं बदलणार हे निश्चित…! कारण आक्रमक संघाला संयमाची जोड धोनीमुळे मिळणार आहे.

इतर बातम्या

T20 वर्ल्डकपमधून काढल्यानंतर या भारतीय गोलंदाजाची कामगिरी सुधारली, आता म्हणतो, जुना युजी परतला!

राजस्थान रॉयल्सला मिळाला 38 सिक्सर ठोकणारा धुरंधर, IPL 2021 मध्ये आता तुफान येणार!

शार्दुल ठाकूरची बँटिंग इतकी कशी सुधारली, टीम इंडियातील दोन शिलेदारांची मदत, वाचा इनसाईड स्टोरी

(MS Dhoni, Anand mahindra and 13 members defence ministry panel on NCC)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI