AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, सुरुवातीच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आता…

आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सशी 23 मार्चला होणार आहे. पण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण पाचवेळा जेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या काही सामन्यात धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, सुरुवातीच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी आता...
मुंबई इंडियन्सImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 14, 2025 | 3:57 PM
Share

मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. पण 2020 पासून आतापर्यंत जेतेपदापासून दूर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे. पण असं सर्व असताना मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही फिट नसल्याची माहिती मिळत आहे. अजूनपर्यंत पाठीदुखीच्या त्रासातून बरा झालेला नाही. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह एप्रिल महिन्याच्या सुरुवातील टीमसोबत येईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरुवातीचे तीन सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे त्याचं संघात कमबॅक होईल की नाही याबाबतही दुसरी चर्चा आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्याबाबत ठोस असा निर्णय आलेला नाही.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर बीसीसीआयची पूर्ण नजर आहे. कारण आयपीएलनंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 च्या दृष्टीने हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे बीसीसीआय टीम मॅनेजमेंट आणि मेडिकल टीम बुमराहबाबत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आता नॅशनल क्रिकेट अकादमीच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. कारण जिथपर्यंत एनसीएकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत बुमराह स्पर्धेत खेळणं कठीण आहे.

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बुमराहशिवाय उतरली होती. पण त्याची उणीव कुठे भासली नाही. भारताने एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. पण मुंबई इंडियन्सला बुमराहची खूपच गरज आहे. त्याच्याशिवाय गोलंदाजीची धार बोथड होणार आहे. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जशी 23 मार्चला चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. 29 मार्चला गुजरात टायटन्सशी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये, तर तिसरा सामना गतविजेत्या कोलकात्याशाी 31 मार्चला होणार आहे

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.