IPL 2021 : 5 वेळा विजयी, मग यंदा प्ले ऑफमध्ये एन्ट्री का नाही?, रोहित शर्मा म्हणतो, ‘कुणीच दोषी नाही फक्त…’

आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये जाण्याचं मुंबई इंडियन्सचं स्वप्न भंगलं पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना रोहितच्या पलटनला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. अखेरच्या सामन्यात मुंबईने बहारदार बॅटिंग करत 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी का जिंकलीय, याचा पुरावा दाखवला.

IPL 2021 : 5 वेळा विजयी, मग यंदा प्ले ऑफमध्ये एन्ट्री का नाही?, रोहित शर्मा म्हणतो, 'कुणीच दोषी नाही फक्त...'
रोहित शर्मा

मुंबई : आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये जाण्याचं मुंबई इंडियन्सचं स्वप्न भंगलं पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना रोहितच्या पलटनला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. अखेरच्या सामन्यात मुंबईने बहारदार बॅटिंग करत 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी का जिंकलीय, याचा पुरावा दाखवला. मुंबईने मॅच जिंकली खरी पण अटी आणि शर्थींच्या अधिन राहून 171 धावांनी विजय मिळविण्यात मुंबईला अपयश आलं. मॅचनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रेक्षकांच्या अखंड पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसंच आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सांघिक कामगिरी करण्यात आम्ही कमी पडल्याची जाहीर कबुली दिली.

मुंबईचा संघ दुसऱ्या टप्प्यात बॅटिंग, बोलिंग किंवा फिल्डिंगमध्ये अपयशी ठरला नाही. कोणतंही एक डिपार्टमेंट दोषी नाही तर संघ म्हणून आम्ही पडलो, असं रोहित शर्मा म्हणाला. मुंबईच्या 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ आठ विकेट्स गमावून 193 धावाच करू शकला. सनरायझर्स हैदराबादवर मुंबईने 42 धावांनी विजय मिळवूनही मुंबई आयपीएलमधून बाद झाली. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी संघाला सनरायझर्सला 65 पेक्षा कमी धावांवर रोखावं लागणार होतं. सनरायझर्स संघ आता गुणतालिकेत सहा गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

सांघिक कामगिरी कमी पडलो, अखंड सपोर्टबद्दल प्रेक्षकांचे आभार

सामन्यानंतर रोहित म्हणाला, “आम्ही जे साध्य केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. दिल्ली झालेला सामना जिंकल्यानंतर आम्ही लयीत होतो पण त्यानंतर कोव्हिडमुळे स्पर्धेला ब्रेक लागला. दुबईत आल्यानंतर एक संघ म्हणून आम्ही एकत्रितपणे अपयशी ठरलो. आज हैदराबादविरुद्ध जिंकल्याचा निश्चित आनंद आहे. आम्ही आमच्या परीने 100 टक्के दिलं. मला खात्री आहे मुंबईचे पाठीराखे आमच्या खेळीवर खूश असतील. “प्लेऑफमध्ये संघाच्या अपयशाबद्दल रोहित म्हणाला,” जेव्हा तुम्ही मुंबईसारख्या फ्रँचायझीसाठी खेळता, तेव्हा तुमच्याकडून नेहमी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. मी याला दबाव म्हणणार नाही”

मागील चार हंगामात आम्ही संघ म्हणून उत्तम कामगिरी केली. पण यंदा जराशी गडबड झाली. आम्ही आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो नाही, याची निश्चित खंत आहे. आमची निराश झालीय, हे देखील खरं आहे. पण आमचे पाठीराखे आमच्यासोबत असतील, याची खात्री वाटतीय. चांगल्या काळात जसे ते आमच्याबरोबर असतात तसेच वाईट काळातही ते आमच्यासोबत असतील, असा विश्वास यावेळी रोहित शर्माने व्यक्त केला.

दुबईत इशान-सूर्याचं वादळ

तत्पूर्वी दुबईच्या मैदानात इशान किशन नावाचं वादळ आलं होतं. अगदी ड्रेसिंग रुममधून सेट होऊन आल्यासारखं इशान हैदराबादच्या प्रत्येक बोलरवर तुटून पडला. 32 चेंडूत त्याने 84 धावा ठोकल्या. तोच कित्ता सूर्यकुमारने गिरवला. त्याने 40 चेंडूत 82 धावा केल्या. इशान-सुर्याच्या झंझावाती खेळीने मुंबईने 9 बाद 235 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएल 2021 ची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

मनीष पांडेने 41 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी करताना 7 चौकार आणि 2 षटकार, जेसन रॉयने 34 आणि युवा अभिषेक शर्माने 33 धावांची खेळी केली. मुंबईकडून जेमी नीशमने 28, जसप्रीत बुमराहने 39 आणि नॅथन कुल्टर-नाईलने 40 धावा देऊन प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.

हे ही वाचा :

#MIvsSRH : सामना जिंकला, पण रनरेटच्या लढाईत मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही, KKR चाहत्यांकडून मजेशीर मीम्स व्हायरल

IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय

MI vs SRH: इशान किशन ON FIRE, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक, दिग्गजांना टाकलं मागे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI