AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs DC Highlight Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सने दिल्लीला 12 धावांनी केलं पराभूत, दिल्लीचा विजयरथ रोखला

| Updated on: Apr 13, 2025 | 11:39 PM
Share

Mumbai Indians vs Delhi Capitals Live Score in marathi : आयपीएल 2025 स्पर्धेच्या 29व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा विजयी रथ मुंबई इंडियन्स रोखणार का?

MI vs DC Highlight Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सने दिल्लीला 12 धावांनी केलं पराभूत, दिल्लीचा विजयरथ रोखला

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2025 स्पर्धेत विजयी घोडदौड अखेर थांबली आहे. सलग चार विजयानंतर पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. तर मुंबई इंडियन्सने या विजयानंतर पुन्हा एकदा स्पर्धेत कमबॅक केलं आहे. मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. मुंबईने गुणतालिकेत आता सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Apr 2025 11:25 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सने दिल्लीला 12 धावांनी केलं पराभूत, दिल्लीचा विजयरथ रोखला

    मुंबई इंडियन्सने अखेर कमबॅक केलं आहे. सलग पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी ट्रॅक पकडला आहे. दुसरीकडे, दिल्लीचं सलग पाचव्या विजयाचं स्वप्न भंगलं आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 19व्या षटकात 193 धावांवर बाद झाला आणि 12 धावांनी पराभूत झाला.

  • 13 Apr 2025 11:21 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला आठवा धक्का, सामना कोण जिंकणार?

    दिल्ली कॅपिटल्सला आठवा धक्का बसला आहे. आशुतोष शर्मा 17 धावा करून बाद झाला.

  • 13 Apr 2025 11:14 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला सातवा धक्का, विप्रज बाद

    दिल्ली कॅपिटल्सला विप्रजच्या रुपाने सातवा धक्का बसला. दिल्ली 14 चेंडूत 26 धावांची गरज आहे.

  • 13 Apr 2025 10:58 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : केएल राहुलच्या रुपाने सहावा धक्का

    केएल राहुल 15 धावा करून तंबूत परतला आहे. कर्णच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि विकेट देऊन बसला.

  • 13 Apr 2025 10:49 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का, अक्षर पटेलनंतर स्टब्स बाद

    दिल्ली कॅपिटल्सला ट्रिस्टन स्टब्सच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. फक्त 4 चेंडूत 1 धाव करून बाद झाला.

  • 13 Apr 2025 10:43 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला चौथा धक्का, अक्षर पटेल बाद

    दिल्ली कॅपिटल्सला अक्षर पटेलच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे.

  • 13 Apr 2025 10:38 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का, करूण नायर बाद

    दिल्ली कॅपिटल्सला करूण नायरच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. करूण नायर 89 धावा करून तंबूत परतला आहे.

  • 13 Apr 2025 10:33 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का, अभिषेक पोरेल बाद

    अभिषेक पोरेल 25 चेंडूत 33 धावा करून बाद झाला आहे. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला.

  • 13 Apr 2025 10:05 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : करुण नायरची अर्धशतकी खेळी, 22 चेंडूत 50 धावा

    करुण नायरने जोरदार कमबॅक केलं आहे. तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये परतला आणि दमदार खेळी केली. त्याने 22 चेंडूत 50 धावा केल्या.

  • 13 Apr 2025 09:58 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : करुण नायर-अभिषेक पोरेड जोडी जमली, मुंबईचं टेन्शन वाढलं

    अभिषेक पोरेल आणि करूण नायर ही जोडी जमली आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेला करूण नायरने जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी मिळून 50 धावांची भागीदारी केली.

  • 13 Apr 2025 09:36 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का, फ्रेझर खातं न खोलता बाद

    दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला आहे. फ्रेझर मॅकबर्क खातं न खोलता तंबूत परतला आहे.

  • 13 Apr 2025 09:20 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  मुंबई इंडियन्सचं दिल्लीसमोर विजयासाठी 205 धावांचं आव्हान

    मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 204 धावा केल्या आणि विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान दिल्ली गाठते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 13 Apr 2025 09:17 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : तिलक वर्मा 59 धावा करून बाद

    तिलक वर्मा 59 धावा करून बाद झाला आहे. मुकेश कुमारच्या षटकात पोरेलने त्याचा झेल पकडला.

  • 13 Apr 2025 08:57 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  तिलक वर्माचं अर्धशतक, 26 चेंडूत केल्या 50 धावा

    तिलक वर्माने 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली आहे.

  • 13 Apr 2025 08:43 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  मुंबई इंडियन्सला चौथा धक्का, सूर्यकुमारनंतर हार्दिक बाद

    सूर्यकुमार यादवनंतर हार्दिक पांड्याची विकेट पडली आहे. हार्दिक पांड्या फक्त 2 धावा करून बाद झाला आहे.

  • 13 Apr 2025 08:38 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव 40 धावांवर बाद

    सूर्यकुमार यादव 28 चेंडूत 40 धावा करून बाद झाला आहे.

  • 13 Apr 2025 08:12 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सला रिकल्टनच्या रुपाने दुसरा धक्का

    मुंबई इंडियन्सला रिकल्टनच्या रुपाने दुसरा धक्का बसला.  41 धावा करून बाद झाला.

  • 13 Apr 2025 08:04 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या 1 बाद 61 धावा

    मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेच्या सहा षटकात रोहित शर्माची विकेट गमावली आमि 61 धावा केल्या.

  • 13 Apr 2025 07:56 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  रोहित शर्मा 18 धावा करून बाद

    मुंबई इंडियन्स सलामीचा फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आहे. त्याने 18 धावा केल्या आणि बाद झाला.

  • 13 Apr 2025 07:38 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  रोहित शर्मा-रिकल्टन जोडीकडून सावध सुरुवात

    रोहित शर्मा आणि रिकल्टन या जोडीने सावध सुरुवात केली आहे. स्टार्कच्या गोलंदाजीवेळी रोहित शर्मा सावध पवित्र्यात दिसला. रिकल्टनने दोन चौकार मारले.

  • 13 Apr 2025 07:10 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : दोन्ही संघांची प्लेइंग 11

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

    मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

  • 13 Apr 2025 07:02 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  दिल्ली कॅपिटल्सने जिंकला नाणेफेकीचा कौल, निवडली प्रथम गोलंदाजी

    दिल्ली कॅपटिल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 13 Apr 2025 05:37 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 : मुंबई संघाचे खेळाडू

    मुंबई इंडियन्स संघ: विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर, रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश, अश्वनी कुमार, राज्य कुमार, बेल्या राज्य बावा, बेल्या राज्य, रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश. अर्जुन तेंडुलकर, कृष्णन श्रीजीत, मुजीब उर रहमान, रीस टोपली, कर्ण शर्मा.

  • 13 Apr 2025 05:36 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  दिल्ली संघाचे खेळाडू

    दिल्ली कॅपिटल्स संघ: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, करुण नायर, दुष्मंता जैव, तृष्णा दास, नॅशनल चॅम्पियन्स, नॅशनल ऑफ इंडिया. नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, माधव तिवारी

  • 13 Apr 2025 05:34 PM (IST)

    MI vs DC Live Score, IPL 2025 :  दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी

    इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 35 सामन्यांपैकी मुंबईने 19 तर दिल्लीने 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Published On - Apr 13,2025 5:34 PM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.