AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरफराज खानच्या छोट्या भावाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा मुंबईचा दुसरा खेळाडू

रणजी स्पर्धेत एकापेक्षा एक सरस खेळाडूंची पारख केली जाते. यातूनच पुढे टीम इंडियात खेळण्याची संधी मिळते. याचं भान बीसीसीआयला असल्याने रणजीकडे पाठ फिरवणाऱ्या फलंदाजांना ताकिद दिली आहे. दुसरीकडे, नवोदित खेळाडूंनी रणजी स्पर्धेचं मैदान गाजवलं आहे. यात सरफराज खानचा भाऊ मुशीरही पाठी नाही.

सरफराज खानच्या छोट्या भावाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा मुंबईचा दुसरा खेळाडू
सरफराज खानच्या छोट्या भावाच्या नावावर विक्रम, रणजी स्पर्धेत केली मोठी कामगिरी
| Updated on: Feb 24, 2024 | 3:49 PM
Share

मुंबई : सरफराज खान याचा छोटा भाऊ मुशीर खान हा देखील जबरदस्त फॉर्मात आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेनंतर मुशीर खान मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे. रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई विरुद्ध बरोडा यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात मुशीर खानची बॅट चांगलीच तळपली. त्याने द्विशतक ठोकत मुंबई संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. मुशीर खानने 350 चेंडूचा सामना केला आणि 18 चौकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केलं. संघाची गरज पाहता शॉट हवेत खेळण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच चौकार ठोकत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. मुशीर खानचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वात मोठा स्कोअर आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर चौथ्या सामन्यातच मोठं यश संपादन केलं आहे. यापूर्वी त्याने तीन फर्स्ट क्लास सामन्यात 96 धावा केल्या होत्या. द्विशतक ठोकत 18 वर्षे आणि 362 दिवसांचा असलेल्या मुशीर रणजी ट्रॉफीत अशी कामगिरी करणारा दुसरा युवा फलंदाज आहे. यापूर्वी हा विक्रम वसीम जाफरच्या नावावर आहे. त्याने 18 वर्षे आणि 262 दिवासांचा असतान द्विशतक ठोकलं आहे.

रणजी स्पर्धेतील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना मुंबई आणि बरोडा संघात सुरु आहे. मुंबईच्या होम ग्राउंडवर हा सामना होत आहे. मुंबईचा निम्मा संघ तंबूत परतला असताना मोठ्या खेळीची आवश्यकता होती. अशावेळी मुशीर खान उभा राहिला आणि मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली. मुंबईची स्थिती 142 धावांवर पाच अशी असताना मुशीर खानने 203 धावांची खेळी करत धावसंख्या 384 पर्यंत पोहोचवली आहे.

पृथ्वी शॉ 33, भुपेन ललवानी 19, मुशीर खान नाबाद 203, अजिंक्य रहाणे 3, शम्स मुलानी 6, सुर्यांश शेडगे 20, हार्दिक टामोरे 57, शार्दुल ठाकुर 17, तनुश कोटियन 7, मोहित अवस्थी 2 आणि तुषार देशपांडे शून्यावर बाद झाला. बरोड्याकडून भार्गव भट्टने सर्वाधिक 7 गडी बाद केले. तर निनाद रथ्वाने 3 गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भुपेन ललवानी, मुशीर खान, शम्स मुलानी, सुर्यांश शेडगे, हार्दिक टामोरे, शार्दुल ठाकुर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे

बरोडा : ज्योत्सनिल सिंग, प्रियांशु मोलिया, शशवत रावत, भार्गव भट्ट, लुकमन मेरिवाला, महेश पिठिया, मिथेश पटेल, विष्णु सोलंकी (कर्णधार), निनाद रथ्वा, राज लिंबानी, शिवालिक शर्मा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.