टी20 स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात सूर्यकुमार यादव, पण कर्णधारपद दुसऱ्याकडे सोपवलं; जाणून घ्या
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. त्याआधी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची लिटमस टेस्ट होणार आहे. फॉर्म परत मिळवण्यासाठी एक संधी मिळणार आहे. पण कर्णधार नाही तर फलंदाज म्हणून उतरणार आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. कारण स्पर्धा भारतात होणार आहे आणि या मालिकेमुळे संघाची लिटमस टेस्ट होईल. दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचीही कसोटी लागणार आहे. या मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक स्टार खेळाडूंना संधी दिली गेली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघातील चार स्टार खेळाडू या संघात आहेत. मुंबई क्रिकेट संघात अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर आणि सरफराज खान यांना संधी दिली गेली आहे. पण या संघाची धुरा सूर्यकुमार यादव नाही शार्दुल ठाकुरकडे दिली गेली आहे. रणजी ट्रॉफीतही मुंबई संघाची धुरा शार्दुल ठाकुरच्या खांद्यावर आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील मुंबईचा पहिला सामना 26 नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमधील टी20 सोडून इतर कोणत्याही फॉर्मेटमध्ये खेळणार नाही हे सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं आहे. पण सूर्यकुमार यादव 6 आणि 8 डिसेंबर रोजी शेवटच्या दोन लीग सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी20 सामना 9 डिसेंबर रोजी आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण सूर्यकुमार यादव गेल्या काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी करत नाही. त्यामुळे चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. आशिया कप स्पर्धेतही त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्याने भारतासाठी वर्ष 2025 मध्ये 15 डाव खेळले आणि 15.33 सरासरीने 184 धावा केल्या.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 साठी मुंबईचा संघ:
शार्दुल ठाकुर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, सरफराज खान, शिवम दुबे, साईराज पाटील, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शम्स मुलानी, तुषार देशपांडे, इरफान उमैर आणि हार्दिक तमोरे (विकेटकीपर).
