AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ruturaj Gaikwad : नाव ऋतुराज गायकवाड! खेळतो नाही गोलंदाजांना धो-धो धुतो! 12 चेंडूत तब्बल 60 धावा, पाहा Highlights Video

जडेजाच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. पण, त्याने आज जे काही केलं. ते म्हणजे अफाट आणि सवोत्तम असं तुम्हीच म्हणाल.

Ruturaj Gaikwad : नाव ऋतुराज गायकवाड! खेळतो नाही गोलंदाजांना धो-धो धुतो! 12 चेंडूत तब्बल 60 धावा, पाहा Highlights Video
नाव ऋतुराज गायकवाड! खेळतो नाही गोलंदाजांना धो-धो धुतो! Image Credit source: social
| Updated on: May 02, 2022 | 12:27 AM
Share

मुंबई : कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) मॅच (match) विनर खेळाडू चांगलाच रंगात आहे. त्याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad). हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो. जडेजाच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. पण, त्याने आज जे काही केलं. ते म्हणजे अफाट आणि सवोत्तम असं तुम्हीच म्हणाल. ऋतुराजने 12 चेंडूत तब्बल 60 धावा काढल्या. तर एकूण 57 चेंडूत त्याने तब्बल 99 धावा काढून आपला खरा रंग दाखवला. इतकंच नव्हे तर 6 चौकार आणि 6 षटकारही या मराठी मुलाने ठोकले. गायकवाडने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारीही केली आणि चांगलाच चर्चेत आला. आता चहुकडे फक्त ऋतुराजच ऋतुराज होतंय. म्हणून हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो म्हणावं लागेल.

ऋतुराज गायकवाडचे सह षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक 99 धावा

चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 203 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने दोन गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या. तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून टी नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या.

ऋतुराज गायकवाड जोरात

डेव्हन कॉनवेच्या जोरदार धावा, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर होत्या. कारण रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सीएसकेची कॅप्टनशिप सोडल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, यात एमएस धोनीने फक्त आठ धावा काढल्या. तो नटराजनच्या बॉलवर उमरान मलिककडून आऊट झाला. धोनीने फक्त आठ धावा काढल्या. त्यापैकी एक चौकार आहे. तर सर्वाधिक चांगल्या धावा ऋतुराज गायकवाडने काढल्या त्याने 57 बॉलमध्ये 99 धावा काढल्या. यामध्ये सहा षटकार आणि तितक्याच चौकारांचा समावेश आहे.त्यानंतर कॉन्वेनं 55 बॉलमध्ये 85 धावा काढल्या. यात 4 षटकार आणि तब्बल 8 चौकारांचा समावेश आहे. तर रविंद्र जडेजाने फक्त एक धावा काढली.

SRH ची प्लेइंग – 11 केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, टी.नटराजन, उमरान मलिक,

CSK ची प्लेइंग – 11 एमएस धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, ड्वेन कॉनवे, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी आणि महीश तीक्ष्णा,

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.