AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Naseem Story : नसीम शाहसोबतचा व्हिडीओ शेअर करण्यावर उर्वशीचं स्पष्टीकरण, काय म्हणाली उर्वशी?

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. ती ट्रोल का झाली, व्हिडीओ शेअर का केला, याविषयी अधिक जाणून घ्या...

Urvashi Naseem Story : नसीम शाहसोबतचा व्हिडीओ शेअर करण्यावर उर्वशीचं स्पष्टीकरण, काय म्हणाली उर्वशी?
नसीम शाह आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला Image Credit source: aaj tak
| Updated on: Sep 11, 2022 | 7:28 PM
Share

नवी मुंबई : आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाचं (Team India) प्रदर्शन फारसं चांगल नव्हतं. त्यामुळे भारतीय संघाला मोठ्या टीकेलाही सामोरं जावं लागलं. सोशल मीडियावर देखील नेटिझन्सकडून सडकून टीका करण्यात आली. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्यानंतर टीम इंडिया आशिया चषकात अंतीम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडली. यामुळे नेटिझन्सकडून देखील प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. भारतीय क्रिकेट टीमकडून चाहत्यांना चांगलीच आशा होती. यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही देखील होती. विशेष म्हणजे उर्वशी भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी देखील पोहचली होती. मात्र, यातच एक गडबड झाली. उर्वशीनं नसीम शाहसोबतचा (Naseem Shah) एक व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडीओ नेमका काय होता, ती का ट्रोल झाली आणि त्यानंतर उर्वशीनं काय स्पष्टीकरण दिलं, तेही जाणून घ्या…

व्हिडीओ नेमका कशाचा होता?

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं शेअर केलेला व्हिडीओमध्ये नसिम हा दिसतोय. यामध्ये तो हसताना दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये ती एका फ्रेममध्ये होती. त्याचवेळी नसीम दुसऱ्या फ्रेममध्ये होता. दोघे एकत्र नव्हते. उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केल्यानंतर चर्चेचा विषय झाला.

उर्वशी काय म्हणाली?

उर्वशीनं इंस्टाग्रामवर एका स्टोरीमध्ये लिहिलंय की, ‘दोन दिवसांपूर्वी माझ्या टीमनं एक क्यूट व्हिडिओ शेअर केला होता, जो चाहत्यांनी एडिट केला होता. आम्हाला माहित नव्हते की आणखी कोण यात सामील आहे. मी मीडियाला याविषयी जाणून घेण्याची विनंती करते. कोणतीही बातमी बनवू नका.  सर्वांना धन्यवाद.’ असं म्हणत उर्वशीनं यावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला.

नसीम काय म्हणाला?

नसीम यानं या प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलं. एका व्हिडिओमध्ये उर्वशीबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, “मला असं काही माहीत नाही, मी मैदानावर खेळतो. अशा प्रकारे लोक व्हिडीओ पाठवत राहतात. जो कोणी स्टेडियमवर येऊन सामना पाहतो, तो त्यांचा मेहरबान असतो. लोकांना ते आवडते ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी कोणी आले तर मी कोणत्या आकाशातून आलो आहे? माझ्यात विशेष काही नाही. उर्वशी कोण आणि काय आहे, हे मला माहीत नाही. व्हिडीओ कुठून आला हे मला माहीत नाही. या सर्व गोष्टींसाठी माझी कोणतीही योजना नाही. मला सध्या फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असं नसीम म्हणालाय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.