AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतून 2 खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’, या दोघांचा समावेश

Icc T20i World Cup 2024 : आगामी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेआधी 2 खेळाडू हे दुखापतीच्या जाळ्यात अडकल्याने त्यांना बाहेर पडावं लागलं आहे.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतून 2 खेळाडू दुखापतीमुळे 'आऊट', या दोघांचा समावेश
t20i world cup trophyImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 23, 2024 | 4:47 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 पैकी पाकिस्तानचा अपवाद वगळता इतर 19 संघ वर्ल्ड कपसाठी सज्ज झाले आहेत. तर पाकिस्तानने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. पाकिस्तान टीम इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेदरम्यान वर्ल्ड कप संघाची घोषणा करणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा वेस्ट इंडिज आणि यूएसएला मिळाला आहे. यूएसएत आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यूएसएतील क्रिकेट चाहत्यांमध्येही आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आता मोजून 9 दिवसांचा अवधी बाकी आहे. अशात एका टीममध्ये तब्बल 2 बदल करण्यात आले आहेत.

नेदरलँड्स क्रिकेट टीममध्ये अचानक 2 बदल करण्यात आले आहेत. मुख्य संघातील 2 खेळाडूंना दुखापत झाल्याने त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. तर त्यांच्या जागी राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. टी 20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेतून 2 खेळाडू बाहेर पडल्याने नेदरलँड्सला मोठा झटका लागला आहे. डेनियल डोरम आणि फ्रेड क्लासेन हे दोघे दुखापतीचे शिकार ठरले आहेत. त्यामुळे या दोघांना टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. तर या दोघांच्या जागी टीममध्ये साकिब जुल्फिकार आणि कायल क्लेन या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.

20 संघ 4 ग्रुप, नेदरलँड्स कोणत्या गटात?

ए ग्रुप: कॅनडा, टीम इंडिया, आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसए.

बी ग्रुप: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड, ओमान आणि नामिबिया.

सी ग्रुप: वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा.

डी ग्रुप: दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि नेदरलँड्स

नेदरलँड्स क्रिेकट टीममध्ये 2 बदल

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, साकिब जुल्फिकार, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.