BAN vs NZ: बांग्लादेशकडून दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 11:01 AM

न्यूझीलंडचा संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही बांग्लादेशने विजयी पताका फडकावली आहे.

BAN vs NZ: बांग्लादेशकडून दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय, ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान
बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील एक क्षण
Follow us

ढाका : न्यूझीलंडचा संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये दुसरा टी-20 सामना शुक्रवारी पार पडला. या सामन्यात बांग्लादेश क्रिकेट संघाने (Bangladesh Cricket Team) उत्कृष्ट अशा टी-20 खेळाचे प्रदर्शन करत न्यूझीलंडवर रोमहर्षक असा अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच बांग्लादेशने न्यूझीलंडवर 2-0 ची आघाडी देखील मिळवली आहे. विशेष म्हणजे या पराभवाने बांग्लादेश संघाने ऑस्ट्रेलियालाही नुकसान पोहोचवले आहे.

आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर बांग्लादेशने न्यूझीलंड विरुद्धही उत्तम कामगिरी सुरु केली आहे. दरम्यान या पहिल्या सामन्या 7 विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर बांग्लादेशने दुसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडला नमवत आयसीसी रँकिंगमध्ये झेप घेतली आहे. त्यामुले ऑस्ट्रेलियाला सातव्या क्रमांकावर घसरावं लागलं असल्याने त्यांच जागतिक क्रमवारीत नुकसान झालं आहे.  बांग्लादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. त्यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 6 विकेटच्या बदल्यात 141 धावा केल्या.  यात सलामीवीर मोहम्मद नईमने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर कर्णधार महमुदुल्लाहने 32 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून रचिन रविंद्रने सर्वाधिक तीन विकेट घेतले.

लाथमची एकाकी झुंज अपयशी

न्यूझीलंडचा संघ 142 धावांचा पाठलाग करत असताना हवी तशी कामगिरी करु शकला नाही. पण शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत अवघ्या चार धावांपासून आपल्या लक्ष्यापासून दूर राहिला. सुरुवातीला 18 धावांवर दोन विकेट पडल्या असताना कर्णदार टॉम लाथमने एकाकी झुंज देत उत्कृष्ट अर्धशतक ठोकलं. त्याने 49 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या.  त्याने 6 चौका आणि 1 षटकार खेचला.

शेवटच्या चेंडूवर षटकार पडला असता तर…

सामना न्यूझीलंड पराभूत झाली असेल तरी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोमहर्षक झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत न्यूझीलंड विजयासाठी शेवटच्या चेंडूवर एका षटकाराची गरज होती. पण सेट बॅट्समन लाथमला अनुभवी मुस्तफिजुर समोर सिक्सर ठोकता आला नाही तो केवळ एकच धाव करु शकला. त्यामुळे कीवी संघाने 20 ओवरमध्ये 5 विकेटच्या बदल्यात 137 धावाच केल्या. बांग्लादेशचा कर्णधार महमुदुल्लाह  सामनावीर ठरला.

हे ही वाचा :

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, ‘या’ खेळाडूला नेमलं उपकर्णधार

(New zealand Cricket team lost by 4 runs against bangladesh in 2nd t20 match)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI