न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडू मृत्यूच्या दाढेतून बाहेर, महिन्याभरानंतर प्रकृतीत सुधार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 12:05 PM

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस कॅर्न्स (Chris Cairns) याला काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती, त्यानंतर आता त्याच्या प्रकतीबद्दलचे नवे अपडेट समोर आले आहेत.

न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडू मृत्यूच्या दाढेतून बाहेर, महिन्याभरानंतर प्रकृतीत सुधार
क्रिस कॅर्न्स

सिडनी : न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटर ख्रिस कॅर्न्स (Chris Cains) याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्याच्या प्रकृतीत सुधार आला असून त्याला लाइफ सपोर्टवरुनही काढण्यात आलं आहे. ख्रिस कॅर्न्स  हा ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून त्याला तिथेच कॅनबरा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.ख्रिसला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्या असल्याने मागील काही वर्षात त्याच्यावर बऱ्याच शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. आता मात्र त्याची प्रकृती काहीशी स्थिर आहे. त्याने त्याच्या कुटुंबियांशी देखील बातचित केली.

ख्रिसच्या वकिलाने सोशल मीडियावर माहिती दरम्यान सांगितले की, ‘आम्हाला खूप आनंद आहे की,ख्रिसची प्रकृती आता ठिक आहे. तो कुटुबियांशी बोलत देखील आहे. फॅन्सने केलेल्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानले आहेत.” न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख डेविड व्हाइट यांनी देखील मागील आठवड्यात ख्रिसच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड त्यांच्या कुटुंबासोबत असून डेविड म्हणाले होते, ”ख्रिस न्यूझीलंडच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. आम्हाला आशा आहे तो पूर्णपणे ठिक होईल.”

ख्रिसची कारकीर्द

51 वर्षीय ख्रिस न्यूझीलंड क्रिकेटमधील एक आघाडीचा अष्टपैलू म्हणून ओळकला जात असे. त्याने न्यूझीलंडकडून 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. 1989 मध्ये डेब्यू केल्यानंतर तो 2006 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  त्यानंतर त्याने स्काई स्पोर्टवर कॉमेंट्री देखील केली होती. निवृत्तीनंतर तो पत्नी मेल आणि मुलांसह ऑस्ट्रेलियातील कॅनबरा येथेच स्थायिक झाला होता.  2000 साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी क्रिसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार 320 धावा करत 218 विकेट्स घेतले आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 4 हजार 950 धावांसह 201 विकेट्सच घेतले आहेत.

हे ही वाचा – 

न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडूची प्रकृती गंभीर, ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात भरती

T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूला विश्रांती

(New zealand Cricketer chris cairns health condition is stable now)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI