AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs ENG : न्यूझीलंड इंग्लंड यांच्यात कसोटी सामना, पण धाकधूक वाढली भारतीय क्रीडाप्रेमींची; कारण की…

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. एकीकडे, भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना होत असताना क्रीडाप्रेमींच्या नजरा या न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटीकडे लागून आहेत. त्याला कारणही तसंच आहे. चला जाणून घेऊयात

NZ vs ENG : न्यूझीलंड इंग्लंड यांच्यात कसोटी सामना, पण धाकधूक वाढली भारतीय क्रीडाप्रेमींची; कारण की...
| Updated on: Nov 28, 2024 | 4:56 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने गमावल्याने सर्वच चित्र बिघडलं आहे. त्यामुळे भारताला काहीही करून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 ने मालिका जिंकावी लागणार आहे. पण हे काय शक्य होईल असं वाटत नाही. भारताने पहिला कसोटी सामना जिंकून त्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. पण विजयाची गाडी रुळावर कायम ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, भारताचं मालिकेतील गणित चुकलं तर न्यूझीलंड, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिकेच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. यात न्यूझीलंडला सर्वाधिक संधी आहे. असं असताना इंग्लंडने न्यूझीलंडला धोबीपछाड देणं भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे. कारण न्यूझीलंडने ही मालिका गमावली तर भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित आणखी सोपं होईल. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या मालिकेत इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 8 गडी गमवून 319 धावा केल्या आहेत.

न्यूझीलंड सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साखळीतील शेवटची मालिका आहे. या मालिकेत इंग्लंडने बाजी मारली तर ते भारताच्या पथ्यावर पडणार आहे. कारण टॉप दोनमध्ये स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडला ही मालिका काहीही करून 2-0 ने जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे, इंग्लंड या स्पर्धेतून आधीच आऊट झाली आहे. जर मालिका न्यूझीलंडने गमावली तर भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका रेसमध्ये असतील.  दरम्यान, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातही दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे.

भारताने 15 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला असून पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने 13 पैकी 8 सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या, श्रीलंका 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळून तिसऱ्या, न्यूझीलंड 11 पैकी 6 सामन्यात विजय मिळवून चौथ्या, तर दक्षिण अफ्रिका 8 पैकी 4 सामन्यात विजय मिळवून पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताने दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्या न्यूझीलंडने आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली आहे. आता भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठून जेतेपद मिळवेल का याकडे लक्ष लागून आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.